AI, 3 D Printing, BIM: नव्या हायटेक तंत्रज्ञानामुळे बांधकाम क्षेत्र सुपरफास्ट!

Housing Sector: थ्रीडी प्रिंटिंग, बीआयएम आणि एआयचा वापर वाढला
हाऊसिंग सेक्टरला नव्या तंत्रज्ञानाचा फायदा
Housing SectorTendernama
Published on

AI, 3D Printing & BIM In Housing Sector: पारंपरीक बांधकाम व्यवसायाचे स्वरुप प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आता मोठ्या प्रमाणात बदलताना दिसते आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात अनेक बांधकाम प्रकल्पांमध्ये अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, बांधकाम व्यवसायिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

हाऊसिंग सेक्टरला नव्या तंत्रज्ञानाचा फायदा
'या' 5 कारणांमुळे महाराष्ट्रातील बांधकाम सेक्टरमध्ये पुन्हा तेजी

बांधकाम उद्योगामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. थ्रीडी प्रिटिंग (3D Printing), बीआयएम (बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग - BIM) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय - AI) या तंत्रज्ञानामुळे प्रकल्पांची अचूकता साधणे, वेळ वाचवणे आणि खर्चावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात बांधकाम क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस मोठे बदल होताना दिसत आहेत. बहुमजली इमारत उभी करण्यासाठी प्रकल्पाची डिझाईन हाताने तयार करावी लागत. त्यासाठी अमर्यादीत वेळ खर्ची पडत असे. खर्चावर निंयत्रण मिळवणे शक्य नव्हते.

पहिल्या प्रयत्नात अचूकता साधणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेकदा नव्याने डिझाईन तयार करावे लागत. मात्र, थ्रीडी प्रिंटिंग अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी वेळेत आणि कमी खर्चात अचूक डिझाईन तयार करणे शक्य झाले आहे. बांधकामांना लागणारे ब्लॉक्स, पिलर, भिंती, छोटे गृहनिर्माण घटक प्रिंटरद्वारे छापले जातात. या प्रक्रियेमुळे मजुरांची संख्या कमी होऊन वेळ वाचवणे शक्य होत आहे.

हाऊसिंग सेक्टरला नव्या तंत्रज्ञानाचा फायदा
नव्या घराची खरेदी का बनलीय अवघड?

७ डी बीआयएम तंत्रज्ञानाचा वापर

बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (बीआयएम) या तंत्रज्ञानाच्या आधारे इमारत बांधण्यापूर्वी तिचे थ्रीडी डिजिटल मॉडेल संगणकावर तयार केले जाते. त्यामध्ये इमारतीचा केवळ आराखडाच नाही, तर इमारतीच्या भिंती, खिडक्या, दरवाजे, वीजेचे जाळे, पाईपलाईन, सुरक्षा यंत्रणा, उष्णता नियंत्रण, पर्यावरण प्रभाव अशा अनेक बाबींचा समावेश असतो. त्याद्वारे आर्किटेक्ट, इंजिनीयर, कंत्राटदार, ग्राहक यांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर जोडले जाते.

यामध्ये आता ४ डी आणि ५ डी बीआयएम तंत्रज्ञान आल्यामुळे कामाचे टप्पे व अंदाजे इमारत उभारण्याचा खर्च, याचे नियोजन करता येते. ७ डी बीआयएम तंत्रज्ञानाचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देखभाल करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

हाऊसिंग सेक्टरला नव्या तंत्रज्ञानाचा फायदा
One State One Registration : 'वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन' म्हणजे काय?

एआयद्वारे प्रत्येक घटकावर नियंत्रण

बांधकाम प्रकल्पासाठी एआयद्वारे प्रकल्पाची डिझाईन, लागणारे मनुष्यबळ, साहित्यावर होणारा खर्च याचे विश्लेषन करून आराखडा तयार केला जातो. कोणत्या टप्प्यावर उशीर होणार, कुठे जास्त खर्च होतोय, याचा अंदाज आधीच बांधला जातो. कामाच्या ठिकाणी कॅमेरे व सेन्सर्सद्वारे कामगारांची हालचाल एआयद्वारे ट्रॅक केली जाते.

अपघात टाळण्यासाठी संभाव्य धोके ओळखता येतात. इमारतींची यंत्रणा म्हणजे लिफ्ट, जनरेटर, इमारतीचे तापमान, आर्द्रता (हवेमधील ओलावा) आणि हवा शुद्ध ठेवण्याचे काम करणारी यंत्रणा केव्हा बिघडू शकते, याचा अंदाज एआयद्वारे लावला जातो. बीआयएम तंत्रज्ञानाद्वारे एचव्हीएसी डक्ट (हवा शुध्द ठेवण्याची यंत्रणा) कसे बसवायचे, त्याची लांबी, स्थान, मेंटेनन्स नियोजन केले जाते.

प्रकल्पाचे निरीक्षण, मोजमाप, फोटो डॉक्युमेंटेशन ठेवण्यासाठी एआय सक्षम ड्रोन वापरले जाते. काही ठिकाणी एआयद्वारे विटा रचणे किंवा कॉंक्रिट ओतणे ही कामे देखील नियंत्रित केली जातात.

बीआयएमचा वापर

- प्रकल्पाचा आराखडा तयार करणे ः आर्किटेक्ट बीआयएम सॉफ्टवेअर वापरून त्रिमितीय आराखडा तयार केला जातो.

- संघटनात्मक समन्वय ः सर्व अभियंते एकाच मॉडेलवर काम करत असल्याने एकमेकांमध्ये समन्वय साधता येतो.

- चुका टाळणे ः बांधकामाच्या आधीच डिजिटली चुका सापडतात, त्यामुळे प्रत्यक्षात दुरुस्तीचा खर्च वाचतो.

- कामाचा गतीशील अभ्यास ः कोणत्या टप्प्यावर कोणते काम होणार हे आधीच पाहता येते.

- देखभाल ः प्रकल्प पूर्ण झाल्यावर देखभाल करणाऱ्या संस्थांना सर्व माहिती डिजिटल स्वरूपात मिळते.

हाऊसिंग सेक्टरला नव्या तंत्रज्ञानाचा फायदा
पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याच्या दिशेने..!

बांधकाम प्रकल्पाची थ्रीडी प्रतिकृती

बांधकाम प्रकल्पाच्या थ्रीडी प्रिटिंगचा आराखडा तयार करण्यासाठी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अत्याधूनिक मशिनला कमांड दिली जाते. मशिनमधून आराखडा जसाच्या तसा तयार होण्यासाठी ३० ते ४० तासाचा अवधी लागतो. त्यानंतर जागेवर इमारत उभी होण्यापूर्वी इमारतीची हुभेहूभ प्रतिकृती समोर ठेवली जाते.

इमारतीमधील एचव्हीएसी डक्ट (हवा शुध्द ठेवण्याची यंत्रणा) कसे बसवायचे, त्याची लांबी, स्थान, लिफ्ट, जनरेटर, इमारतीचे तापमान, आर्द्रता (हवेमधील ओलावा), हवा शुद्ध ठेवणे, पर्यावरणीय समतोल कसा राखला जातो, या बाबी प्रकल्पाच्या प्रतिकृतीद्वारे दर्षविल्या जातात, अशी माहिती ऑटो क्लस्टरच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याची अटीवर सांगितली.

हाऊसिंग सेक्टरला नव्या तंत्रज्ञानाचा फायदा
Home Lone घेण्यापूर्वी एकदा हे वाचाच!

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे टाऊनशिपचे डिजिटल मॉडेल बनवले आहे. डिजिटलायझेशनसोबतच फिजिटेबल ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्याद्वारे प्रकल्पाला भेट देणा-या ग्राहकांना इमारतीचा केवळ आराखडाच नाही, तर इमारतीच्या भिंती, खिडक्या, दरवाजे, वीजेचे जाळे, वातानुकुलीत लिफ्ट, पाईपलाईन, सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था, उष्णता नियंत्रण, पर्यावरण प्रभाव अशा अनेक बाबी स्क्रीनवर दाखवल्या जातात. त्याचबरोबर एका क्लिकवर प्रकल्पाच्या निर्धारित परिघात असणा-या शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, औषधालये, राष्ट्रीय महामार्गा, मेट्रो स्टेशन, मार्केटची माहिती दाखवली जाते.

- आकाश अगरवाल, संचालक, क्रिसाला डेव्हलपर्स

फ्लॅट घेताना ग्राहकांना टच ॲण्ड फिलचा अनुभव अपेक्षित असतो. त्यासाठी प्रोजेक्टमध्ये असणा-या फ्लॅटची सॅम्पल प्रतिकृती तयार केली जाते. त्यामध्ये ग्राहकांना तो अनुभव घेता येतो. आता एआय टेक्नॉलॉजी आल्यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी संपूर्ण प्रोजेक्ट आणि परिसरातील इतर बाबींची माहिती मिळते. आजपर्यंत थ्रीडी टेक्नॉलॉजीच्या आधारे ग्राहकांना प्रोजेक्टमधील इत्यंभूत बाबी ऑन स्क्रिन दाखवित आलो आहोत. पण, पुढील काळात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे ग्राहकांना माहिती देण्याचा मानस आहे. शहराची भौगोलिक माहिती नसणा-या ग्राहकांना त्याचा नक्कीच फायदा होईल.

- रोहन गायकवाड, संचालक, बिवेगा ग्रुप

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com