पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याच्या दिशेने..!

Eco-friendly construction materials
Eco-friendly construction materialsTendernama
Published on

पुणे (Pune) : औद्योगिक क्षेत्रातील रोजगार आणि उत्पादनाप्रमाणे या क्षेत्रातील कचरा (औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनानंतर शिल्लक राहिलेल्या वस्तू - Industrial Waste) देखील वाढत आहे. त्यासाठी कंपनी स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्यानंतरही हा कचरा वाढतच असल्याचे चित्र आहे. या समस्येवर मात करण्यासाठी ‘मॅग्नस व्हेंचर्स’ या स्टार्टअपचे संशोधन महत्त्वपूर्ण ठरत आहे. औद्योगिक कचऱ्यातून पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य तयार करण्याचे काम हे स्टार्टअप करत आहे.

Eco-friendly construction materials
Pune : पुणे रेल्वे स्थानकाला वगळून 'असा' होणार नवा रेल्वे मार्ग

विशेष म्हणजे पुण्यातील एका तरुण उद्योजकाने या स्टार्टअपची स्थापना केली आहे. ‘मॅग्नस व्हेंचर्स’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक असलेले उद्योजक आलोक काळे यांचे संशोधन बांधकाम आणि उद्योग क्षेत्रातील कार्बन उर्त्सजनाचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

जमिनीतील कचऱ्यातून औद्योगिक कचरा वळविणे आणि बांधकाम उद्योगाचे नैसर्गिक संसाधनांवरील अवलंबित्व कमी करण्यावर त्यांचा विशेष भर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘मॅग्नस व्हेंचर्स’ने मागील तीन वर्षांत आपल्या उद्योगात अनेक पटींनी वाढ केली असून, कंपनीच्या वतीने शाश्वत अशी टाइल्स व स्टोन अदेसिव्ह, तयार प्लास्टर, ब्लॉक अदेसिव्ह, ग्राऊट्स व स्क्रिड्स अशी बांधकामात वापरली जाणारी उत्पादने बाजारात आणली आहेत.

Eco-friendly construction materials
Pune : पुणे रेल्वे स्थानकाला वगळून 'असा' होणार नवा रेल्वे मार्ग

अशी झाली उद्योगाची सुरवात

माझ्या वडिलांचा ऑटोमोबाईल क्षेत्रातील काही उत्पादने घेण्याचा व्यवसाय आहे. २०१० मध्ये मी वडिलांच्या व्यवसायात सहभागी झालो. तिथेही औद्योगिक कचऱ्याची समस्या आणि त्यांचा पुनर्वापर हा विचार माझ्या डोक्यात कायम होता. त्यामुळे मी वडिलांसोबत काम करीत असताना याबाबतचे संशोधन कायम ठेवले. त्यानंतर मी औद्योगिक कचऱ्याच्या अनुषंगाने उद्योग सुरू करण्याचे ठरवले.

२०१९ मध्ये पहिल्यांदा मी व्यावसायिक पातळीवर सिलिका सँडपासून बांधकामाच्या विटा बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याला पुण्यातील मोठ्या विकसक कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मी बांधकामाच्या इतर उत्पादनांवर संशोधन करून ती बाजारात आणली.

Eco-friendly construction materials
NHAI चा मोठा निर्णय; रस्ते बांधकामातील विलंब टाळण्यासाठी आता...

काळे यांना ‘सस्टेनेबिलिटी क्रुसेडर’ पुरस्कार

‘जे. पी. श्रॉफ फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ‘सस्टेनेबिलिटी क्रुसेडर’ पुरस्कार यावर्षी काळे यांना जाहीर झाला आहे. ‘सस्टेनेबिलिटी स्टार्ट-अप’ या विभागामध्ये काळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात येणार आहे.

नोकरी आणि उद्योगाच्या निमित्ताने परदेशात गेलो होतो. तेथील औद्योगिक कचऱ्याची समस्या मला जाणवली. आपल्याकडे देखील औद्योगिक कचऱ्याचा प्रश्न वाढत आहे. त्यामुळे मी त्यावर लक्ष केंद्रित करत संशोधन सुरू केले. त्यातून आमच्या स्टार्टअपची निर्मिती झाली. टाइल्स, स्टोन अदेसिव्ह, रेडी मिक्स प्लास्टर यासारख्या पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती आम्ही करतो. त्यातून औद्योगिक कचऱ्याची समस्या कमी होऊन पर्यावरण रक्षणाचे देखील काम होत आहे.

- आलोक काळे, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, मॅग्नस व्हेंचर्स

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com