Bullet Train : बुलेट ट्रेनच्या महाराष्ट्रातील स्टेशन्सला युनिक लूक

चार स्टेशनचे डिझाईन जाहीर
Mumbai-Ahmedabad Bullet Train
Mumbai-Ahmedabad Bullet TrainTendernama

मुंबई (Mumbai) : रेल्वे मंत्रालयाने मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरील महाराष्ट्रातील चार स्टेशनचे डिझाईन जाहीर केले आहे. या चारही स्टेशनची डिझाईन युनिक आहे.

Mumbai-Ahmedabad Bullet Train
Mumbai : 'बेस्ट' 10 लाख स्मार्ट वीज मीटर बसवणार; 1300 कोटींचे बजेट
bullet train
bullet trainTendernama

508 किमी लांबीच्या साडे तीनशे किमी वेगाने धावण्याची क्षमता असणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गाचे काम गुजरातमध्ये वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पाचे काम काहीकाळ रखडले होते. या प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. गोदरेज एण्ड बॉयस कंपनीची जमीन अधिग्रहनाला आव्हान देणारी आणि 264 कोटीचे नुकसान भरपाई मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने हा प्रकल्प महाराष्ट्रातही आता वेग पकडणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात बुलेट ट्रेनला सुमारे २० हजार कोटीचा निधी रेल्वेने मंजूर केला आहे.

Mumbai-Ahmedabad Bullet Train
Mumbai : हायटेक नालेसफाई; रोबोटिक बहुउद्देशीय उत्खनन यंत्राचा वापर
bullet train
bullet trainTendernama

बुलेट ट्रेनच्या वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्ससह (बीकेसी) ठाणे, विरार आणि बोयसर या चार स्टेशनचे डिझाईन नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. बीकेसी स्थानक संपूर्ण भूमिगत असणार आहे. आकाशातील ढग आणि समुद्राची भरती आणि ओहोटीच्या थीमवर बीकेसी स्टेशनची डिझाईन आहे. बीकेसी हे एकमेव अंडरग्राऊंड स्थानक असणार आहे. येथे तीनमजली स्टेशन असणार आहे. प्लॅटफॉर्म, कॉनकोर्स आणि सर्व्हीस फ्लोअर असे तीन मजले असणार आहेत. जमिनीच्या पातळीपासून 24 मीटर खाली प्लॅटफॉर्म असणार आहेत. बीकेसी स्टेशनसाठी 6 प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार असून ते 16 डब्याच्या ट्रेन उभी राहील या लांबीच्या असतील. हे स्टेशन मेट्रो आणि रोडशी जोडलेले असणार आहे. स्टेशनला दोन एण्ट्री व एक्झिट पॉईंट असणार आहेत. एक प्रवेशद्वार मेट्रो लाईन 2 - बी बरोबर कनेक्ट केलेले असणार असून दुसरे गेट एमटीएनएल इमारतीच्या दिशेला असणार आहे. तसेच मेट्रो, बसेस, ऑटो आणि टॅक्सी या वाहतूक साधनांशी हे स्टेशन जोडले जाणार आहे.

Mumbai-Ahmedabad Bullet Train
Mumbai : पूर्व, पश्चिम मार्गांच्या दुरुस्तीसाठी 250 कोटींचे टेंडर
bullet train
bullet trainTendernama

ठाणे स्टेशन उल्हास नदीजवळ असणार आहे. त्यामुळे या स्टेशनच्या प्रवेशद्वार इमारतीचे छत लाटांच्या आकाराचे करण्यात येणार आहे. विरारला जीवदानीचा डोंगर असल्याने वाऱ्याने हलणाऱ्या प्रतिमांचा विरार स्टेशनच्या डिझाईनमध्ये वापर करण्यात आला आहे. बाेईसर स्टेशन हा किनारपट्टीचा एक भाग असल्याने स्थानिक मच्छिमार बांधवाच्या मासेमारीच्या जाळ्यांना या स्टेशनमध्ये महत्व देण्यात आले आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गावर एकूण 12 स्टेशन असणार असून त्यात 8 स्टेशन गुजरातमध्ये तर 4 स्टेशन महाराष्ट्रात असणार आहेत. साबरमती, अहमदाबाद, आणंद/नाडीयाड, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा, वापी, ही आठ स्टेशन गुजरातमध्ये तर बोयसर, विरार, ठाणे, बीकेसी अशी चार स्टेशन महाराष्ट्रात आहेत. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com