PWD : दीड कोटी रुपयांपर्यंतची टेंडर प्रक्रिया आता अवघ्या महिन्यात होणार पूर्ण

E Tender
E TenderTendernama

नाशिक (Nashik) : टेंडर प्रसिद्ध केल्यानंतर आवडत्या ठेकेदाराला टेंडर मिळत नसल्याच्या कारणांमुळे तसेच राजकीय नेत्यांच्या दबावातून तांत्रिक लिफाफा महिनोंमहिने उघडला जात नाही. अनेकवेळा टेंडरची मुदत संपून जाते, तरी वित्तीय लिफाफा उघडला जात नाही व फेरटेंडर प्रक्रिया राबवली जाते. या सर्व चुकीच्या पायंड्यांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आता टेंडर प्रसिद्ध करण्यापासून ते कार्यादेश देण्यापर्यंतचे कालबद्ध वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार आता दहा लाख ते दीड कोटीपर्यंतची टेंडर प्रक्रिया ३० दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक आहे.

E Tender
Pune : PCMC च्या विकासकामांचे ऑडिट होणार? अजितदादा काय निर्णय घेणार?

त्याप्रमाणे दीड कोटी ते २५ कोटी, २५ कोटी ते १०० कोटी, व शंभर कोटींवरील कामांची टेंडर प्रक्रिया अनुक्रमे ५३, ६२ व ८९ दिवसांमध्ये पूर्ण करावी लागणार आहे. यामुळे लोकप्रतिनिधींच्या मर्जितील ठेकेदाराला टेंडर मिळण्याचा मार्ग मोकळा होईपर्यंत टेंडर न उघडण्याच्या प्रकाराला आळा बसेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

E Tender
Nashik : जलजीवनच्या कामांबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता त्रयस्थ संस्थेकडून...

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांच्या विभागाने मंजूर केलेली बांधकामे, रस्ते यांची कामे केली जातात. त्याच पद्धतीने आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण आदी विभागांची बांधकामासंबंधी कामे केली जातात. यासाठी राबवण्यात येत असलेल्या टेंडर प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत. यामुळे टेंडर प्रक्रिया राबवण्यात कालापव्यय होत असल्याच्या तक्रारी होत आहे. लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या मतदारसंघातील कामे विशिष्ट ठेकेदारांकडून  करण्याला प्राधान्य दिले जाते. परिणामी त्या ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी विभागावर दबाव टाकण्याचेही प्रकार घडत असतात. यामुळे संबंधित अधिकारी टेंडर प्रक्रिया लांबवण्यावर भरत देतो व दरम्यानच्या काळात इतर ठेकेदारांना माघार घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.

E Tender
Nashik : महापालिकेचा सिंहस्थ पूर्व आराखडा बुधवारी होणार तयार

नको असलेले ठेकेदार माघार घेत नसतील, तर त्या टेंडरचा तांत्रिक व वित्तीय लिफाफा उघडला जात नाही व टेंडरची मुदत संपल्यानंतर फेर टेंडर राबवले जाते. या सर्व प्रकारांमध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यातच आठ दहा महिने जातात व काम सुरू होण्यास उशीर होत असतो. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर टेंडर मागवणे, तांत्रिक लिफाफा उघडणे, कागदपत्रांची पडताळणी करणे, प्राप्त तक्रारींचे निवारण करणे,वित्तीय लिफाफा उघडणे, सर्वात कमी देकार असलेला ठेकेदार निश्चित करून  टेंडर मंजूर करणे व कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देणे आदी कार्यवाहीचे वेळापत्रक निश्चित केले आहे. या नव्या वेळापत्रकानुसार १० लाख ते दीड कोटीपर्यंतची टेंडर प्रक्रिया ३० दिवसांमध्ये पूर्ण करावी लागणार आहे. तसेच दीड कोटी ते २५ कोटी रुपयांपर्यंतची टेंडर प्रक्रिय ५३ दिवसांत, २५ कोटी ते १०० कोटी रुपये कामाची टेंडर प्रक्रिया ६२ दिवसांत व शंभर कोटींवरील कामांची टेंडर प्रक्रिया ८९ दिवसांमध्ये पूर्ण करावी लागणार आहे.

E Tender
तगादा : Mumbai-Goa महामार्गासाठी रायगडात पुन्हा एल्गार

या नवीन वेळापत्रकानुसार आता टेंडर सादर करण्याच्या अंतिम दिनांकापासून तीन दिवसांच्या आत तांत्रिक लिफाफा उघडणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे दीड कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांसाठी टेंडरपूर्व बैठक टेंडर प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून सात दिवसांनंतर घेता येणार आहे. तसेच अंतिम पात्र टेंडरधारकांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर वित्तीय लिफाफा उघडण्याची मुदत सर्व टेंडरसाठी केवळ एक दिवसांची देण्यात आली आहे. इतर बाबींसाठी टेंडरच्या रकमेनुसार कालावधी निश्चित केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या वेळापत्रकानुसार काम केल्यास टेंडर कालावधी कमी होऊन सर्वच विभागांची कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com