Pune : मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पातील मोठी अडचण दूर

प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होऊन नदी स्वच्छ
Pune Riverfront Project (File)
Pune Riverfront Project (File) Tendernama

पुणे (Pune) : मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, ११ ठिकाणी मैलाशुद्धीकरण केंद्र (एसटीपी) बांधण्यासाठी जमीन ताब्यात येण्याची अडचणही दूर झाली आहे. हा प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होऊन नदी स्वच्छ होईल, असे केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले.

Pune Riverfront Project (File)
Mumbai-Goa Highway : निधी मंजूर होऊन दीड वर्षे झाली तरीही रखडपट्टी

‘धारा २०२३’ परिषदेच्या उद्‍घाटनानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. शेखावत म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील मुळामुठा नदी स्वच्छ करण्यासाठी केवळ चर्चा सुरू होती. पण मोदी सरकारने जपानच्या जायका कंपनीच्या अर्थसहाय्यद्वारे प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. १४७४ कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नदी शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण केला जाईल. यामध्ये पुणे महापालिकेसह राज्य सरकारनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Pune Riverfront Project (File)
Mumbai : गुड न्यूज; 'ती' आली, 'ती' धावली अन् 'ती' जिंकली!

धारा परिषद पुण्यात होत असल्याने पुणे महापालिकेला यानिमित्ताने मोठी संधी निर्माण झाली आहे. रिव्हर सीटी अलायन्समधून (आरसीए) महापालिका एकमेकांना माहितीचे आदानप्रदान करतील, नवा दृष्टिकोन मिळेल, चुका सुधारता येईल व काम गतीने होणार आहे.’’

Pune Riverfront Project (File)
Pune : कोंडीने हडपसरकर वैतागले; का लागल्या वाहनांच्या रांगा?

कोणत्या ना कोणत्या योजनेतून मदत...
केंद्र सरकारतर्फे नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी निधी दिला जात नाही. त्यामुळे स्वतःच्या निधीतून किंवा क्रेडिट नोटद्वारे पीपीपी तत्त्वावर काम करावे लागत आहे. नदी काठ सुधार प्रकल्पासाठी शासन मदत का करत नाही? असे विचारले असता, त्यावर शेखावत यांनी ‘‘सरकार कोणत्या ना कोणत्या योजनेच्या माध्यमातून या प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करून देत असतं.’’ असे उत्तर दिले. केंद्र सरकार आणि पुणे महापालिकेतर्फे आयोजित ‘धारा २०२३’ या राष्ट्रीय परिषदेमध्ये मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची माहिती देण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलवरील ‘पुणेरी लोगो’ आणि ‘पुणेरी काका’ मॅसकॉटने देशभरातील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Pune Riverfront Project (File)
Pune : वाढत्या खासगी वाहनांमुळे PMP स्लो; BRT मात्र सुसाट, कारण...

पुणे महानगरपालिकेने या परिषदेच्या ठिकाणी मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवनप्रकल्पाची माहिती देणारा स्टॉल उभारला आहे. या प्रकल्पातून नदी स्वच्छता, प्रदूषणमुक्त करणे, पुराचा धोका कमी करणे, नदीच्या बाजूने सार्वजनिक जागेची निर्मिती, नदीत पाणी टिकवून ठेवणे, नदीकडे जाण्याचा रस्ता सुधारणे, ऐतिहासिक वास्तूंचे जतन याबाबतही माहिती पुणेरी स्टॉलवर देण्यात आली होती. देशाच्या विविध भागातून आलेले महापालिका आयुक्त, तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांची मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत जाणून घेण्याची उत्सुकता होती. मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची माहिती प्रत्येक पुणेकरांपर्यंत जाण्यासाठी महापालिकेने ‘PuneRé (पुणेरी) च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहे. याच माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी पुणेरी चित्रकला घेण्यात आली. या स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शनही ‘धारा २०२३’ परिषदेत लावण्यात आले होते.

५२ शहरातील नद्यांचे पाणी एकत्र
‘धारा २०२३’ या परिषदेसाठी येताना अधिकाऱ्यांनी त्यांच्या शहरातील नदीचे पाणी आणावे, असे आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. ५२ नद्यांचे पाणी एकत्र करण्यात आल्याने त्यानिमित्ताने नद्यांच्या पाण्याचा कृत्रिम संगम करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com