Pune : वाढत्या खासगी वाहनांमुळे PMP स्लो; BRT मात्र सुसाट, कारण...

PMP
PMPTendernama

पुणे (Pune) : रस्त्यांवर वाढत जाणाऱ्या खासगी वाहनांच्या संख्येमुळे शिवाय अन्यही कारणांमुळे ‘पीएमपी’चा (PMP Bus) वेग प्रचंड मंदावला आहे. ‘पीएमपी’ बसचा वेग ताशी सरासरी १२ किलोमीटर इतका झाला आहे. बसच्या संख्येत वाढ झाली असली तरीही फेऱ्यांच्या संख्येत पर्यायाने ‘पीएमपी’च्या रोजच्या वाहतुकीत वाढ झालेली नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे ‘पीएमपी’चा घटलेला वेग.

PMP
Nagpur : 1165 कोटी मंजूर पण एक पैसाही नाही मिळाला

‘पीएमपी’च्या सध्या सुमारे १८०० बस रोज धावत असून, त्यांची रोजची सुमारे साडेतीन लाख किमीची वाहतूक होत आहे. १९९७-९८ साली म्हणजेच २५ वर्षांपूर्वी ‘पीएमपी’च्या ताफ्यात ९०० बस होत्या. त्याच्या माध्यमातून रोज सुमारे तीन लाख २५ हजार किलोमीटरची वाहतूक होत असत. त्या वेळी बसचा सरासरी वेग हा ताशी २५ किलोमीटर इतका होता.

२५ वर्षांत ‘पीएमपी’च्या बसची संख्या ९०० नी वाढली, रोजची वाहतूक २५ हजार किलोमीटरने वाढली. मात्र सरासरी वेग कमालीचा घटला आहे. २५ वर्षांपूर्वी बसचा सरासरी वेग हा २५-३० इतका होता. वेगात मात्र ‘पीएमपी’ची मोठी पीछेहाट सुरू आहे. त्याचा थेट फटका ‘पीएमपी’ प्रशासनाला बसत आहे.

PMP
BMC : 263 कोटींचे 'ते' टेंडर 'फ्रेम'; भाजपचा गंभीर आरोप

काय आहेत कारणे?
१) दरवर्षी वाढत जाणारी खासगी वाहनांची वाढती संख्या. दरवर्षी पुण्यात सरासरी तीन लाख नव्या वाहनांची भर पडत आहे. यात केवळ पुणे आरटीओकडे नोंद झालेल्या वाहनांचा विचार केला आहे. दुसऱ्या शहराच्या पासिंग असलेल्या वाहनांचा नाही.
२) शहरातील सिग्नल. शहरातील वाहतूक नियमनासाठी सिग्नल असणे गरजेचे आहे, मात्र पूर्वीच्या तुलनेत सिग्नलची संख्या वाढल्याने एका मार्गावरच्या बसला किमान १० ठिकाणी सिग्नलला थांबावे लागते.
३) रस्त्यांच्या विशेषतः गावठाण भागातील रस्त्याच्या विस्तारीकरणाला आलेल्या मर्यादा.
४) रस्त्यावरचे वाढते अतिक्रमण, रस्त्याच्या बाजूला होणारे पार्किंग आदी.

२५ वर्षांपूर्वी स्थिती
- बस संख्या : ९००
- रोजची बसची सरासरी वाहतूक : तीन लाख २५ हजार किमी
- बसचा सरासरी वेग : २५ किमी प्रति तास

२०२३ मधील स्थिती
बस संख्या : १८००
रोजची बसची सरासरी वाहतूक : तीन लाख ५० हजार किमी
प्रवासी संख्या : १२ लाख
प्रवासी उत्पन्न : १ कोटी ५० लाख
बसचा सरासरी वेग : १२ किमी प्रति तास

PMP
Pune: पुणे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्यांना रेल्वेचा दिलासा...

वेग मंदावल्याचा फटका
१. पीएमपीच्या बसचा वेग मंदावल्याचा सर्वांत जास्त फटका प्रवाशांना बसतोय. प्रवाशांना आठ ते १० किमीच्या प्रवासासाठी किमान एक तास खर्ची घालावा लागतोय.
२. प्रवास रेंगाळत असल्याने फेऱ्यांच्या संख्येत वाढ होत नाही. परिणामी उत्पन्नांवर परिणाम होतोय.
३. इंधनावरचा खर्च वाढला.
४. टायर, इंजिन यासह अन्य देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च वाढतोय. त्याचा ही फटका पीएमपी बसतोय.

‘बीआरटी’चे फायद्याचे गणित
१. गर्दीच्या मार्गावरून धावणाऱ्या बसच्या तुलनेत ‘बीआरटी’मधून धावणाऱ्या बसची कार्यक्षमता अधिक आहे. ‘बीआरटी’मधून धावणाऱ्या बसचा ताशी सरासरी वेग ३० किलोमीटरचा आहे. त्यामुळे बसची संख्या कमी असली तरीही ‘बीआरटी’मधील प्रवास जलद व तुलनेने कमी वेळेत पूर्ण होतो. परिणामी प्रवाशांच्या वेळेत बचत होते. तर दुसरीकडे बसच्या फेऱ्यांत देखील वाढ होते.
२. ‘बीआरटी’मधून धावणाऱ्या बसची संख्या : ६७४
३. दिवसभरातील फेऱ्या : ८२१५
४. बसची रोजची सरासरी वाहतूक : १ लाख ५७ हजार ६६१ किलोमीटर
५. एकूण अंतर : ६४ किलो मीटर
६. प्रवासी संख्या : सुमारे ४ लाख ३० हजार.
७. प्रवासी उत्पन्न : ७० ते ७५ लाख

PMP
NHAI: 'या' 4 जिल्ह्यांतील 122 गावांतील जमिनीला येणार सोन्याचा भाव

बीआरटीमधून धावणाऱ्या बसचा वेग हा अन्य मार्गावर धावणाऱ्या बसच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने बीआरटी सेवा अधिक फायदेशीर आहे. त्याचा विस्तार होणे गरजेचे आहे.
- अनंत वाघमारे, बीआरटी प्रमुख, पीएमपीएमएल, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com