BMC : 263 कोटींचे 'ते' टेंडर 'फ्रेम'; भाजपचा गंभीर आरोप

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संकल्पनेतून मुंबईत सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत शहरात सुरू असलेल्या कामांच्या टेंडर (Tender) प्रक्रियांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. मित्रपक्षाच्याच आमदाराने केलेल्या या आरोपांमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

BMC
Pune: पुणे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्यांना रेल्वेचा दिलासा...

रस्त्यावर बसवण्यात येणाऱ्या बाकांच्या (स्ट्रीट फर्निचर) खरेदीसाठी मागवलेल्या २६३ कोटींच्या टेंडर प्रक्रियेत अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे असल्याचा आरोप कोटेचा यांनी केला आहे. ही टेंडर प्रक्रिया रद्द करावी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी अशी मागणी कोटेचा यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

BMC
NHAI: 'या' 4 जिल्ह्यांतील 122 गावांतील जमिनीला येणार सोन्याचा भाव

राज्य सरकारच्या संकल्पनेतील प्रकल्पात खालच्या स्तरावर कसा भ्रष्टाचार सुरू आहे, ते आयुक्तांच्या निदर्शनास आणण्यासाठी पत्र लिहिले असल्याचे कोटेचा यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत प्रतिक्रियेसाठी चहल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र मुंबई पालिकेने संपूर्ण महानगराच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हाती घेतला आहे.

या प्रकल्पाची टेंडर विभाग पातळीवरून काढली जात आहेत. प्रकल्पाच्या लहानमोठ्या टेंडरमध्ये घोळ झाल्याचा आरोप यापूर्वी माजी नगरसेवकांनी केला होता. त्यानंतर आता भाजपचे आमदार कोटेचा यांनी यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.

BMC
Nagpur : सरकारकडून घरकुल बजेटमध्ये कपात; गरिबाचे घराचे स्वप्न...

रस्त्यांवरील बाकांसाठी २६३ कोटींचे काम कंत्राटदारांना मिळावे यासाठी विशिष्ट अटींचा टेंडरमध्ये समावेश करण्यात आला. प्रकल्प केंद्रीय खरेदी विभागाच्या अखत्यारीत येत नसताना त्या विभागाकडून टेंडर प्रक्रिया राबविली जात आहे. विविध प्रकारच्या १३ वस्तूंसाठी एकच कंत्राटदार कसा, तीन कंत्राटदारांपैकी दोघांना कामाचा अनुभव नाही. एकालाच काम मिळवून देण्यासाठी साटेलोटे केल्याचा आरोप कोटेचा यांनी केला आहे.

BMC
Aurangabad: गुड न्यूज! औरंगाबाद लेणी-जटवाडा रस्त्याचे भाग्य उजळणार

महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना भाजपने मुंबई महापालिकेत पहारेकरी म्हणून भूमिका बजावली होती व अनेक प्रकरणांतील भ्रष्टाचार बाहेर काढले होते. भाजपने पाठपुरावा केल्यामुळे अनेक प्रकल्पांची टेंडर रद्दही करावी लागली होती.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com