Pune Elevated Roads: पुणेकरांसाठी सरकारने दिली गुड न्यूज! पुणे-शिरूरसह 3 उन्नत मार्गांना गती

पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत मार्गांवर भविष्यातील मेट्रोची तरतूद; पुणे-शिरूर प्रवास ४५ ते ५० मिनिटांत
elevated corridor
elevated corridorTendernama
Published on

मुंबई (Mumbai): पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या एकूण १३८ किलोमीटर लांबीच्या तीन महत्त्वाकांक्षी उन्नत महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. डीएफबीओटी तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांतून राज्य शासनाला एकूण ९५० कोटी रुपयांचा आगाऊ प्रीमियम मिळणार आहे. भविष्यातील मेट्रोसाठीही मार्गांच्या डिझाईनमध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. 

elevated corridor
Railway Over Bridges: तीन वर्षांत 145 उड्डाणपूल उभारून महाराष्ट्र 'रेल्वे फाटक मुक्त' करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुणे शहर आणि परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन उन्नत महामार्ग प्रकल्पांच्या कामाला गती देण्यात आली आहे. एकूण १३८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून डीएफबीओटी तत्त्वावर हे प्रकल्प राबविले जाणार आहेत. यामधून शासनाला पुणे-शिरूर प्रकल्पातून ५०० कोटी, तळेगाव-चाकण-शिक्रापूर प्रकल्पातून ३०० कोटी आणि हडपसर-यवत प्रकल्पातून १५० कोटी असा एकूण ९५० कोटी रुपयांचा आगाऊ प्रीमियम मिळणार आहे. तीनही प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

elevated corridor
Railway Infrastructure: दिल्ली - चेन्नई रेल्वे कॉरिडॉरची क्षमता वाढणार; ताडाळी - घुग्गुस मार्गासाठी 228 कोटी

मेट्रोसाठी त्रिस्तरीय रचना

भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीचा विचार करून उन्नत मार्गांवर मेट्रो मार्गिका उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे. खाली भूपृष्ठीय रस्ता, त्यावर उन्नत महामार्ग आणि सर्वांत वर मेट्रो अशी त्रिस्तरीय रचना प्रस्तावित आहे. या एकत्रित रचनेमुळे भविष्यातील मेट्रो पायाभूत सुविधांच्या खर्चात सुमारे ४० टक्के बचत होण्याची अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

पुणे-शिरूर प्रवास ५० मिनिटांत

पुणे-शिरूर महामार्गाची लांबी ५३.४ किलोमीटर असून, त्यामध्ये खराडी जकात नाका ते कोंढापुरीदरम्यान ३१ किलोमीटरचा सहापदरी उन्नत मार्ग उभारला जाणार आहे. रांजणगाव आणि कारेगाव येथे प्रत्येकी दोन किलोमीटरचे उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. उन्नत मार्गाखाली चारपदरी समांतर रस्ता असेल. दुसऱ्या स्तरावर सात किलोमीटरच्या संभाव्य मेट्रो मार्गाची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे-शिरूर प्रवासाचा कालावधी ४५ ते ५० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

elevated corridor
Mumbai Bandra Connector: मुंबईत वांद्रे सागरी सेतू ते वांद्रे किल्ला कनेक्टर; 45 मिनिटांचा प्रवास केवळ 10 मिनिटांवर येणार

औद्योगिक पट्ट्याला आधुनिक जोडणी

तळेगाव-चाकण-शिक्रापूर प्रकल्पाची लांबी ५३.२ किलोमीटर आहे. यामध्ये २६.३ किलोमीटरचा चारपदरी उन्नत मार्ग आणि संपूर्ण ५३.२ किलोमीटरचा चारपदरी भूपृष्ठीय महामार्ग विकसित केला जाणार आहे. या मार्गामुळे चाकण औद्योगिक परिसर, पुणे रिंग रोड आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडणी मिळून मालवाहतूक व लॉजिस्टिक क्षेत्राला गती मिळणार आहे.

पुरंदर विमानतळाशी जोडणी

हडपसर-यवत प्रकल्पाची लांबी ३१.५ किलोमीटर असून, त्यात २५ किलोमीटरचा सहापदरी उन्नत मार्ग आणि सहापदरी भूपृष्ठीय महामार्ग प्रस्तावित आहे. उरुळी कांचनपर्यंत ९.७५ किलोमीटरच्या संभाव्य मेट्रो मार्गासाठीही तरतूद आहे. हा मार्ग प्रस्तावित पुरंदर विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ आणि पुणे रिंग रोडला जोडला जाणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हे मार्ग पुण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.

elevated corridor
Urban Challenge Fund: महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठी 'अर्बन चॅलेंज फंड'; 44,800 कोटींच्या प्रकल्पांना मिळणार गती

Key Points Summary

  • पुण्यातील १३८ किलोमीटर लांबीच्या तीन उन्नत महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन.

  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून प्रकल्पांची अंमलबजावणी.

  • प्रकल्पांतून राज्य शासनाला ९५० कोटी रुपयांचा आगाऊ प्रीमियम.

  • पुणे-शिरूर प्रकल्पाची लांबी ५३.४ किलोमीटर.

  • तळेगाव-चाकण-शिक्रापूर प्रकल्पाची लांबी ५३.२ किलोमीटर.

  • हडपसर-यवत प्रकल्पाची लांबी ३१.५ किलोमीटर.

  • भविष्यातील मेट्रोसाठी मार्गांच्या डिझाईनमध्ये स्वतंत्र तरतूद.

  • एकत्रित रचनेमुळे मेट्रोच्या खर्चात सुमारे ४० टक्के बचतीची अपेक्षा.

  • पुणे-शिरूर प्रवासाचा कालावधी ४५ ते ५० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा.

  • तीनही प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन. 

Tendernama
www.tendernama.com