Pune City News: 'पेन्शनरांच पुणं' ही पुण्याची ओळख बदलतेय; कारण...

Pune City
Pune CityTendernama

पुणे (Pune) : राहण्यासाठी उत्तम शहर म्हणून पुण्याला (Pune City) प्राधान्य दिले जाते. केवळ पायाभूत सुविधांची उभारणी न करता आनंद देणारे शहर म्हणूनही ओळख बनली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिणामी, कधी काळी 'पेन्शनरांचे पुणे' ही पुण्याची ओळख आता बदलते आहे. (Pune City's New Identity)

Pune City
Pune: बकोरियांच्या दणक्याने PMPचा 'टॉप गियर'; उत्पन्नचा नवा विक्रम

उद्याने, मोकळ्या जागा जास्तीत जास्त नागरिकांसाठी उपलब्ध करून थीम पार्क, संग्रहालये, क्रीडांगणाच्या माध्यमातून त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासाला बळ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या शहरात २१० उद्याने असून, ६५० एकर जमीन हिरवळीने नटलेली आहे, त्यामुळे पुण्याने उद्यानांचे शहर म्हणून ओळख मिळवली आहे.

पुण्याची ओळख असलेली सारसबाग ही नानासाहेब पेशवे यांनी १७५० मध्ये निर्माण केली. येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. याशिवाय, पुणेकरसुद्धा दररोज सकाळी, संध्याकाळी न चुकता फिरायला जातात.

Pune City
Railway: गुड न्यूज; पुणे-मिरज प्रवास होणार सुसाट, कारण...

जसा काळ बदलत आहे, त्याच पद्धतीने शहरातील बागांचे स्वरूपही बदलत जात आहे. थीम पार्कच्या माध्यमातून गुलाब उद्यान, तलाव उद्यान, लहान मुलांसाठी साहसी खेळाचे उद्यान, आयुर्वेदिक उद्यान, खाणीतील उद्यान, पेशवे ऊर्जा उद्यान, पुणे ओकायमा मैत्री उद्यान, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे ग्राम संस्कृती उद्यान असे उद्यान विकसित केले.

पूर्वी बंगळूर उद्यानाचे शहर म्हणून ओळखले जायचे. पण, आता ही ओळख पुण्याने मिळवली आहे. पुण्यात आणखी सात ते आठ उद्याने विकसित होण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती उद्यान विभागाचे अधिक्षक अशोक घोरपडे यांनी दिली.

Pune City
Housing: घर खरेदी करण्याचा विचार असेल तर ही बातमी नक्की वाचा...

नदीकाठ सुधार प्रकल्प सुरू आहे. त्यातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने विविध प्रकारचे संग्रहालये उभी केली आहेत.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

Pune City
Davos: नाशकात 'ही' कंपनी करणार मोठी गुंतवणूक; तब्बल 2 हजार रोजगार

शहरी आनंद वाढेल यासाठी उद्यान, चौक, रस्ते, मोकळ्या जागा विकसित केल्या पाहिजेत. संस्कृती, इतिहास, परंपरा यांचा विचार करून, पण त्यांचा अर्थ न बदलता ते कसे समकालीन आहेत हे आधुनिक स्वरूपात सुशोभीकरणातून मांडल्यास नागरिकांना त्याबद्दल आपुलकी निर्माण होते. पुण्याला सांस्कृतिक इतिहासाची पार्श्‍वभूमी असल्याने उद्याने, ॲमेनिटी स्पेस, चौक विकसित करताना अशा पद्धतीचे काम करण्याची संधी आहे.

- पारस नेत्रगावकर, वास्तुविशारद

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com