Nashik Kumbh Mela 2027: मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर

महापालिकेच्या ३६ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा; कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तांकडून नाशिक-नांदुरी रस्त्याची पाहणी
devendra fadnavis
devendra fadnavisTendernama
Published on

नाशिक (Nashik) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा घेत कार्यान्वयीन यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना कामांचा वेग आणि दर्जाबाबत तंबी दिल्यानंतर नाशिकमधील प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. महापालिकेने जबाबदारीचे पालन न केल्याबद्दल ३६ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. दुसरीकडे, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरणाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाची प्रगती आणि गुणवत्ता तपासली.

devendra fadnavis
Chhatrapati Sambhajinagar Water Project: पाणीपुरवठा योजना मिशन मोडवर; अर्धवट कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुमारे ३४ हजार कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि अन्य पायाभूत सुविधांच्या कामांचा समावेश आहे. मात्र, नाशिक शहर आणि परिसरातील काही रस्त्यांची कामे रखडली असून, शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. ७) मुंबईत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत सिंहस्थ कामांचा आढावा घेतला. सर्व कामे नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी कार्यान्वयीन यंत्रणांना दिले. सिंहस्थाच्या कामांचा आपण स्वतः वेळोवेळी आढावा घेणार असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.

devendra fadnavis
Nitin Gadkari: नाशिक-पुणे महामार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी 7801 कोटी मंजूर

३६ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनंतर नाशिक महापालिकेने सिंहस्थाशी संबंधित कामांची जबाबदारी निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण न करणे आणि रस्तेकामांपूर्वी पाणीपुरवठा योजनांच्या पाइपलाइनची कामे नियोजित वेळेत न केल्याप्रकरणी बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागातील ३६ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नोटिसा देण्यात आलेल्यांमध्ये कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. कामांच्या अंमलबजावणीतील जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.

devendra fadnavis
Nashik Kumbh Mela: ₹34,732 कोटींच्या कामांना गती द्या; कंत्राटदारांना मुख्यमंत्र्यांचा इशारा

नाशिक-नांदुरी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी (ता. ११) नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, कुंभमेळा प्राधिकरणाचे उपआयुक्त योगेंद्र चौधरी, संबंधित कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि तृतीय पक्ष गुणवत्ता नियंत्रण पथकातील अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाची भौतिक प्रगती, बांधकामाची गुणवत्ता आणि कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. युटिलिटी स्थलांतर, भूसंपादनाशी संबंधित बाबी, कामातील अडथळे आणि काम पूर्ण करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या नियोजित वेळापत्रकाची माहितीही आयुक्तांनी घेतली.

devendra fadnavis
Nashik: एमएनजीएलच्या मनमानीपुढे महापालिका प्रशासन हतबल झालेय का?

गुणवत्तेशी तडजोड नको

आयुक्त शेखर सिंह यांनी रस्त्याच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेची पाहणी केली. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्धारित तांत्रिक निकष, गुणवत्ता मानके आणि लागू नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक गुणवत्ता चाचण्या नियमितपणे घेऊन त्यांच्या नोंदी ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

तपासणीदरम्यान कामात आढळणाऱ्या त्रुटींची तातडीने पूर्तता करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणांना देण्यात आल्या. रस्त्याच्या कामाची भौतिक प्रगती, गुणवत्ता नियंत्रणाची कार्यवाही आणि अपेक्षित पूर्णत्व कालावधी यासह प्रकल्पाची अद्ययावत माहिती नियमितपणे उपलब्ध ठेवण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.

devendra fadnavis
Nashik: 77 कार्यादेश रखडले; रस्ते दुरुस्तीचे कार्यादेश न स्वीकारणाऱ्या ठेकेदारांवर काय कारवाई होणार?

Key Points

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तंबीनंतर सिंहस्थ कामांबाबत प्रशासन सक्रिय झाले.

  • मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी (ता. ७) मुंबईत सिंहस्थ कामांचा आढावा घेतला.

  • कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश कार्यान्वयीन यंत्रणांना देण्यात आले.

  • मुख्यमंत्री स्वतः सिंहस्थ कामांचा वेळोवेळी आढावा घेणार आहेत.

  • नाशिक महापालिकेने ३६ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या.

  • नोटिसा देण्यात आलेल्यांमध्ये कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे.

  • रस्ते आणि पाणीपुरवठा पाइपलाइनची कामे वेळेत पूर्ण न केल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे.

  • कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी नाशिक-नांदुरी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

  • रस्त्याची भौतिक प्रगती, बांधकाम गुणवत्ता, युटिलिटी स्थलांतर आणि भूसंपादनाचा आढावा घेण्यात आला.

  • गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेचीही आयुक्तांनी पाहणी केली.

  • प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता चाचण्या घेऊन त्यांच्या नोंदी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

  • कामातील त्रुटींची तातडीने पूर्तता करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

Tendernama
www.tendernama.com