Nashik Export Update: कांदा-द्राक्षांपलीकडे गेले नाशिक! वाहनांचे सुटे भाग, औषधे आणि व्हिस्कीच्या निर्यातीत लक्षणीय वाढ

गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तब्बल तीन हजार कोटींची घसघशीत वाढ; कांदा-द्राक्षासह औषधे, वाहनांचे सुटे भाग आणि आयटी बोर्ड्सची अमेरिकेत सर्वाधिक निर्यात
Nashik City, nmc, Kumbh
Nashik City, nmc, KumbhTendernama
Published on

नाशिक (Nashik): पश्चिम आशियातील वाढता तणाव, अमेरिकेसोबत रेंगाळलेला व्यापार करार आणि अमेरिकेने भारतावर लादलेले अतिरिक्त आयात शुल्क यांसारख्या अत्यंत प्रतिकूल आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर मात करत नाशिक जिल्ह्याने निर्यातीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात नाशिकमधून तब्बल २७ हजार ३२५ कोटी रुपयांच्या उत्पादनांची जागतिक बाजारात निर्यात झाली आहे. विशेष म्हणजे, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा नाशिकच्या एकूण निर्यातीत तब्बल ३ हजार कोटी रुपयांची (सुमारे १२ टक्के) घसघशीत वाढ नोंदवली गेली आहे.

Nashik City, nmc, Kumbh
Maharashtra PWD: 27 हजार कोटींच्या रस्त्यांसाठी 1.37 लाख रुपयांची तरतूद

पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थिती, अमेरिकेसोबत लांबलेला व्यापार करार व त्यातून अमेरिकेने भारतावर लादलेले आयातशुल्क या पार्श्वभूमिवर नाशिक जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात २७ हजार ३२५ कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात झाली आहे. या निर्यात होणा-या उत्पादनांमध्ये प्रामुख्याने कांदे, द्राक्षे या प्रमुख कृषी उत्पादनांप्रमाणेच औषधे, वाहनांचे सुटे भाग, एसी जनरेटर, लोखंडी पाईप, व्हिस्की यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत जिल्ह्याच्या निर्यातीत तब्बल तीन हजार कोटींनी वाढ झाली असून नाशिकमधून सर्वाधिक निर्यात अमेरिकेत (३,३८० कोटी रुपये) झाली आहे.
 

Nashik City, nmc, Kumbh
Nashik Citylink: नाशिककरांचा E-Bus प्रवास लांबला; 50 इलेक्ट्रिक बसेस रखडल्याने 125 वाहकांच्या टेंडरला ब्रेक

नाशिक जिल्ह्यातून निर्यातीची चर्चा होताना प्रामुख्याने कांदा व द्राक्षे याच दोन कृषी उत्पादनांची होत असली तरी नाशिक जिल्ह्यातून कृषी उत्पादनांप्रमाणेच औषधे, वाहनांचे सुटे भाग व इतर औद्योगिक उत्पादनांचीही निर्यात वर्षागणिक वाढत असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राच्या आकडेवारीतून पुढे आले आहे. नाशिक जिल्ह्यातून  २०२३-२४ मध्ये २३ हजार २२३ कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात झाली होती. हा आकडा २०२२-२३ च्या एकूण निर्यातीपेक्षा सुमारे सहाशे कोटींनी कमी होता.

रशिया-युक्रेन युद्ध, केंद्र सरकारने कांद्यावर लादलेली निर्यातबंदी यामुळे २०२-२४ मध्ये निर्यात घटली होती. त्यानंतर सलग दोन वर्षे जिल्ह्याच्या निर्यातीत वाढ होत गेली. जिल्ह्यातील निर्यात २०२४-२५ मध्ये ४.६ टक्क्यांनी वाढून २४ हजार २९७ कोटींपर्यंत पोहोचली होती. त्याच निर्यातीत २०२५-२६ मध्ये  तब्बल बारा टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली असून एकूण निर्यात २७ हजार ३२५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Nashik City, nmc, Kumbh
Kumbh Mela Infra: वेळेचे गणित हुकणार? अवघे 10 महिने शिल्लक! कुंभमेळा प्राधिकरणाच्या कामांचा वेग मंदावलाय का?

सर्वाधिक निर्यात अमेरिकेत (३,३८० कोटी) झाली आहे. अमेरिकेत औषधे, वाहनांचे सुटे भाग, बेअरिंग, गॅस वा तेलाचे लोखंडी पाईप, एसी जनरेटर या उत्पादनांची निर्यात झाली आहे. त्या खालोखाल संयुक्त अरब अमिराती (२,८३० कोटी), नेदरलॅण्ड्स (१,८३१ कोटी),दक्षिण आफ्रिका (१,५९७ कोटी), जर्मनी (१,२४० कोटी) या प्रमुख देशांत निर्यात झाली. संयुक्त अरब अमिरातीत कांदे, द्राक्षे, व्हिस्की, बोर्ड्स, पॅनल्स,औषधे, दक्षिण आफ्रिकेत वाहने व त्यांचे सुटे भाग, औषधे, डंपर यांची, तर जर्मनीत कॅपॅसिटर्स, बॉल बेअरिंग द्राक्षे आदींची निर्यात झाली.

दरम्यान, सातत्याने होणारे बदल आदी प्रतिकूल अमेरिका-इराण, रशिया-युक्रेन युद्ध, कारणे असूनही निर्यातीत झालेली अमेरिकेकडून व्यापार धोरणांतील अस्थिरता या पार्श्वभूमीवर ही वाढ आशादायक आहे. भारत व अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधात तणाव निर्माण झाल्यानंतर सरकारने निर्यातीसाठी पर्यायी देशांची शोध घेऊन तेथे निर्यात सुरू केल्याने या अस्थिर परिस्थितीतही निर्यातीत वाढ झाल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.

Nashik City, nmc, Kumbh
Trimbakeshwar Tourism: सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी बदलणार ब्रह्मगिरीचा चेहरा; काय आहे ॲक्शन प्लॅन?

नाशिक जिल्ह्यातून झालेली निर्यात

२०२३-२४ :  २३ हजार २२३ कोटी रुपये

२०२४-२५ :  २४ हजार २९७ कोटी रुपये

२०२५-२६ :  २७ हजार ३२५ कोटी रुपये

Tendernama
www.tendernama.com