Nashik : ओबीसींना खुश करण्यासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा! 'या' योजनेतून 3 वर्षांत...

Narendra Modi, Eknath Shinde
Narendra Modi, Eknath ShindeTendernama

नाशिक (Nashik) : राज्यात ओबीसींसाठी मोदी आवास घरकूल योजना राबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेअंतर्गत २०२३ ते २०२६ पर्यंत नाशिक जिल्ह्याला एकूण २३ हजार १७७ लक्षांक प्राप्त झाला आहे. यासाठी तीन वर्षांमध्ये ओबीसींना घरकुलांसाठी ३०५ कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने जिल्ह्यात घरे नसलेल्या नागरिकांच्या यादीतून ओबीसी प्रवर्गातील नागरिकांची संख्या निश्चित केली असून, त्या यादीतील सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील तीन वर्षांमध्ये घरे देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Narendra Modi, Eknath Shinde
Nashik : ओझरच्या HAL मध्ये Airbus विमानांच्या देखभाल दुरस्तीतून मिळणार 500 जणांना रोजगार

राज्यातील ओबीसींना घरकूल देण्यासाठी राज्य सरकारने मोदी आवास घरकूल योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी ठरवण्यासाठी २०११ च्या सामाजिक सर्वेक्षणातून पक्की घरे नसलेल्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून, ती यादी केंद्र सरकारच्या आवास प्लस या पोर्टलवर टाकण्यात आली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतून कोणत्याही लाभार्थ्याला लाभ देताना त्या यादीत नाव असणे बंधनकारक असते अथवा घर नसलेल्या लाभार्थ्याला स्वतंत्र ड प्रपत्रातील अर्ज भरावा लागतो. त्या अर्जानुसार निवड समिती छाननी करून त्या लाभार्थ्याबाबत निर्णय घेत असते. दरम्यान राज्य सरकारने मोदी आवास घरकूल योजना जाहीर केल्यानंतर जिल्हा ग्रामीण यंत्रणेने आवास प्लस पोर्टलवरील लाभार्थ्यांच्या यादीमधून ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. त्या यादीत २३,१७७ ओबीसींना पक्की घरे नसल्याचे समोर आले आहे.

Narendra Modi, Eknath Shinde
Jalgaon : गुलाबराव पाटलांची मोठी घोषणा; जळगाव जिल्ह्यातील 'त्या' 1,845 कुटुंबांसाठी गुड न्यूज

यामुळे या सर्व २३,१७७ लाभार्थ्यांना पुढील तीन वर्षांमध्ये या योजनेतून पक्की घरे देण्याचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. या योजनेतून लाभार्थ्यांना २६९ चौरस फूट स्वत:च्या अथवा सरकारी जागेत घर बांधण्यासाठी १,२०,००० रुपये व शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये, असे १,३२,००० रुपये प्रति लाभार्थी दिले जाणार आहेत. यामुळे पुढील तीन वर्षांमध्ये ओबीसींना घरे देण्यासाठी राज्य सरकार ३०५ कोटी रुपये खर्च करणार आहे.

नाशिक तालुकानिहा लक्ष्यांक
 येवला : १८७६,
 निफाड : २४५०,
 नांदगाव : ४५०९
 बागलाण : २९५३,
चांदवड : १११३,
 देवळा : ११५८
 दिंडोरी : ५६७
इगतपुरी : १८४६
कळवण : ९४०
 मालेगाव : ३५८८
नाशिक : २८५,
 पेठ : २
सिन्नर : १८७५
 सुरगाणा : १,
 त्र्यंबकेश्वर : १४

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com