Nashik : ओझरच्या HAL मध्ये Airbus विमानांच्या देखभाल दुरस्तीतून मिळणार 500 जणांना रोजगार

HAL  Ozar
HAL OzarTendernama

नाशिक (Nashik) : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि विमान निर्माती कंपनी एअरबस यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे 'ए-३२०' विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल करण्याचा करार झाला. या करारानुसार या विमानांची देखभाल नाशिकच्या ओझर येथील एचएएल कारखान्यात होणार असून या कारखान्यात देखभालीसाठी एअरबसचे पहिले विमान नोव्हेंबर २०२४ पर्यंत येणार आहे. यामुळे ५०० जणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.

HAL  Ozar
Nagpur : दीक्षाभूमीच्या 200 कोटींच्या विकासासाठी प्रशासकीय मान्यता

दरम्यान नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी यांनी मान्यता दिल्यानंतर नाशिकच्या एचएएलमध्ये पूर्ण आशिया खंडातील एअरबसची विमाने देखभाल-दुरुस्तीसाठी येऊ शकणार आहेत.

भारतात सर्वसमावेशक एमआरओ सेवा स्थापन करण्याचा एचएएलचा प्रयत्न आहे. त्यामुळे जगभरातील प्रवाशी वाहतूक विमान कंपन्यांना एकाच ठिकाणी ही सेवा उपलब्ध करण्याचा हेतु आहे. त्यानुसार एअरबससोबत पहिला करार झाला असून पुढच्या टप्प्यात जगभरातील विमान कंपन्यांना ही सेवा पुरवण्यासाठी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.

HAL  Ozar
Jalgaon : गुलाबराव पाटलांची मोठी घोषणा; जळगाव जिल्ह्यातील 'त्या' 1,845 कुटुंबांसाठी गुड न्यूज

याच धोरणाचा एक भाग म्हणून नवी दिल्ली येथे एचएएलच्या मिग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदीआणि एअरबसचे दक्षिण आशियाई विभागाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रेमी मलई यांच्या उपस्थितीत एमआरओ ( मेन्टेनन्स, रिपेअरिंग व ओव्हरऑईल) करार करण्यात आला.

लढाऊ विमानांच्या देखभाल-दुरुस्तीचे कौशल्य असलेल्या ओझरच्या एचएएल प्रकल्पात आता एअरबसच्या  ए ३२० या प्रवाशी विमानांचीही देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. नागरी हवाई करारानुसार ओझर येथील एचएएलच्या प्रकल्पात खासगी प्रवासी विमानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.

HAL  Ozar
Nashik : सिटीलिंकला वाहक पुरवण्यासाठी दुसरा ठेकेदार होईना राजी

५०० जणांना थेट रोजगार
निमाकडून बऱ्याच वर्षापासून नागरी विमानांच्या दुरुस्तीचा प्रकल्प नाशिक एचएएलला सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भेटी घेतल्या होत्या. या देखभाल दुरुस्तीच्या प्रकल्पामुळे किमान ५०० लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

या ठिकाणी विमान खोलणे, त्याची स्वच्छता व दुरूस्ती करणे आणि खोललेले विमान बांधून त्याला पेंटिंग करणे, अशी विविध कामे होतील व त्या कामांसाठी स्थानिक उद्योगांकडील वस्तूंची मागणी वाढू शकणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com