
मुंबई (Mumbai): मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केल्याने प्रकल्पासाठी सकारात्मक संकेत मिळत आहेत.
या प्रकल्पाची एकूण लांबी 749 किलोमीटर इतकी असेल. तसेच या रेल्वेचा ताशी वेग 330 ते 350 किलोमीटर इतका असेल, ज्यामुळे मुंबई ते नागपूरचा प्रवास 2 ते 2.25 तासांत पूर्ण होईल.
नागपूर जिल्ह्यात या मार्गातील 111 किलोमीटरचा ट्रॅक असणार असून तो समृद्धी महामार्गालगत बांधण्याचा विचार होऊन साडेतीन वर्षे झाली. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेड (एनएचआरसीएल) यासाठी डीपीआर करणार होते. या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर ऑफिसही सुरू करण्यात आले होते.
या महत्त्वाकांशी प्रकल्पासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गाला लागून समांतर हायस्पीड रेल्वे ताशी 330 ते 350 किलोमीटर प्रतीतास वेगाने धावेल असा प्रस्ताव होता. म्हणजेच या वेगाने ही ट्रेन दोन ते सव्वा दोन तासात मुंबई ते नागपूर अंतर कापेल.
समृद्धीचे बांधकाम होत असताना रेल्वे मंत्रालयाने नागपूर ते मुंबई हायस्पीड रेल्वेवर अभ्यास केला आहे. 78 टक्के काम गतीने होणे शक्य होते. 22 टक्के काम संयुक्तपणे करावे लागणार आहे. याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे हा एक प्रस्तावित प्रकल्प आहे, जो महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर या दोन प्रमुख शहरांना हायस्पीड रेल्वेद्वारे जोडेल. हा प्रकल्प समृद्धी महामार्गालगत बांधला जाणार असून, यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या प्रकल्पाची एकूण लांबी 749 किलोमीटर आहे. या मार्गावर एकूण 14 विशेष रेल्वे स्थानके उभारली जाणार आहेत. यात अजनी, खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव जहाँगीर, मेहकर, जालना, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, नाशिक, घोटी बुद्रुक, शहापूर, आणि ठाणे या स्थानकांचा समावेश असणार आहे.
या रेल्वेचा ताशी वेग 330 ते 350 किलोमीटर प्रति तास असेल, ज्यामुळे मुंबई ते नागपूरचा प्रवास 2 ते 2.25 तासांत पूर्ण होईल. या रेल्वेची प्रवासी वाहतूक क्षमता 750 प्रवाशांपर्यंत असेल. या मार्गावर एकूण 15 बोगदे बांधले जाणार असून, त्यांची एकूण लांबी 25.23 किलोमीटर असेल.