महत्त्वाची बातमी! 14 ते 24 ऑगस्ट दरम्यान 'या' 9 रेल्वे गाड्या रद्द

railway
railwayTendernama
Published on

सोलापूर (Solapur): दक्षिण - पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील अलमट्टी-जनमकुंटी-मुगळोळी-बागलकोट या ३५ किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी १४ ते २४ ऑगस्ट दरम्यान अनेक गाड्या रद्द किंवा मार्ग वळविण्यात आले आहेत. यामध्ये सोलापूर - होस्पेटसह तब्बल ९ गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे हम्पी होस्पेट, विजयपूर, धारवाडसह दक्षिण कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

railway
एकनाथ शिंदेंनी दिली गुड न्यूज! ठाणे मेट्रोचा मुहूर्त ठरला

सोलापूर, पंढरपूर, विजयपूर, धारवाड, होस्पेट आणि हुबळी या मार्गांवर प्रवास करणाऱ्यांनी या १० दिवसांत पर्यायी प्रवासाचे नियोजन करावे. दुहेरीकरणानंतर रेल्वेगाड्यांची गती वाढणार असून, वेळेत बचत होणार आहे. तसेच पंढरपूर - म्हैसूर गोलगुंबज एक्स्प्रेस २३ ऑगस्टला पंढरपूरहून ६० मिनिटे उशिरा सुटेल. तरी वरील बदल लक्षात घेऊन प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट किंवा स्थानिक रेल्वे स्थानकावर तपशील तपासून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

'या' गाड्या झाल्या रद्द

सोलापूर - होस्पेट - सोलापूर एक्स्प्रेस (१४ ते २४ ऑगस्ट) हुबळी - सोलापूर डेली पॅसेंजर ( १६ ते २४ ऑगस्ट) सोलापूर-धारवाड डेली पॅसेंजर (१७ ते २४ ऑगस्ट), हुबळी-विजयपूर इंटरसिटी स्पेशल (१७ ते २३ ऑगस्ट) विजयपूर-हुबळी पॅसेंजर स्पेशल (२० ते २३ ऑगस्ट).

railway
AI, 3 D Printing, BIM: नव्या हायटेक तंत्रज्ञानामुळे बांधकाम क्षेत्र सुपरफास्ट!

'या' गाड्या अंशतः रद्द

यशवंतपूर- विजयपूर एक्स्प्रेस : विजयपूरऐवजी बागलकोटपर्यंत धावेल. (१३ ते २२ ऑगस्ट) विजयपूर- यशवंतपूर एक्स्प्रेस बागलकोटहून सुरू होईल. (१४ ते २३ ऑगस्ट) म्हैसूर - बागलकोट बसवा एक्स्प्रेस विजयपूरऐवजी बागलकोटपर्यंत धावेल. मुंबई- होस्पेट सुपरफास्ट : विजयपूरपर्यंत धावेल. (१३ ते २२ ऑगस्ट) होस्पेट - मुंबई सुपरफास्ट : विजयपूरहून सुरू होईल. (१४ ते २३ ऑगस्ट) मंगळूर - विजयपूर एक्स्प्रेस : बागलकोट/ हुबळीपर्यंत धावेल. विजयपूर- मंगळूर एक्स्प्रेस : बागलकोट / हुबळीहून सुरू होईल. हुबळी - विजयपूर पॅसेंजर : बागलकोटपर्यंत धावेल (१४ ते १९ ऑगस्ट).

railway
Devendra Fadnavis: अहिल्यानगर-पुणे रेल्वेमार्ग नेमका कोठून जाणार?

'या' गाड्यांच्या मार्गात बदल

हुबळी-हैदराबाद एक्स्प्रेस (१५ ते २२ ऑगस्ट) : गदग- होस्पेट- बल्लारी मार्गे. हैदराबाद- हुबळी एक्स्प्रेस (१६ ते २२ ऑगस्ट) : वाडी- रायचूर मार्गे (शहाबाद, होले व आलूर थांबे वगळले जातील.)

अलमट्टीला ‘या’ गाड्यांना थांबा नाही

म्हैसूर- पंढरपूर गोलगुंबज (१८-२२ ऑगस्ट), पंढरपूर- म्हैसूर गोलगुंबज (१९-२३ ऑगस्ट), मुंबई- होस्पेट सुपरफास्ट (१८ - २२ ऑगस्ट), होस्पेट- मुंबई सुपरफास्ट (१९-२३ ऑगस्ट), यशवंतपूर- बिकानेर (२२ ऑगस्ट), बिकानेर- यशवंतपूर (१७ व १९ ऑगस्ट), साईनगर शिर्डी- म्हैसूर (२० ऑगस्ट), बनारस- हुबळी (१७ ऑगस्ट).

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com