मुंबईची यंदा तरी 'तुंबई' न होण्यासाठी ५४५ कोटींचे ३० टेंडर मंजूर

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात नालेसफाई केली जाते. त्याचबरोबर चर पुनर्भरणाचे कामही केले जाते. मात्र, यावर्षी याबाबत प्रस्ताव मंजूर केला नसल्याने नालेसफाईची कामे सुरू झालेली नाहीत. यावरून मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनावर टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच एकूण ३० टेंडर्सना महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल (IqbalSingh Chahal) यांनी मंजुरी दिली आहे. या सर्व टेंडरच्या कामांची एकूण किंमत सुमारे ५४५ कोटी रुपये इतकी आहे.

Mumbai
मुंबई महापालिकेचे 294 कोटींचे 'ते' वादग्रस्त टेंडर रद्द!

पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी मोठ्या नाल्यांसाठी एकूण ६ टेंडर मंजूर करण्यात आले असून, ती ७१ कोटी रुपयांची आहेत. लहान नाल्यांसाठी सुमारे ९१ कोटी रुपये एकत्रित किंमतीच्या १७ टेंडरना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये शहर भागासाठी २, पूर्व उपनगरांसाठी ६ तर पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी ९ याप्रमाणे टेंडर मंजूर करण्यात आले आहेत. म्हणजेच, मोठे व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सुमारे १६२ कोटींच्या १६ प्रस्तावांना प्रशासकांनी मान्यता दिली आहे.

Mumbai
मुंबई-नागपूर सुसाट; समृद्धीमुळे अंतर अवघे एवढ्या तासांवर

दरम्यान, पावसाळ्यापूर्वीच्या रस्त्यांवरील चर पुनर्भरणी कामांचा भाग म्हणून परिमंडळनिहाय प्रत्येकी एक अशा ७ टेंडरना देखील मान्यता मिळाली आहे. त्यांची एकत्रित किंमत ३८३ कोटी रुपये इतकी आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यासाठी ही मंजुरी मिळाल्याने उपयोगिता संस्थांना कार्यादेश देवून तातडीने कामे सुरु करता येणार आहेत.

Mumbai
मुंबई-गोवा सुसाट...; आता थेट सिंधुदुर्गापर्यंत पर्यायी मार्ग

मुंबईत महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च रोजी संपला. ८ मार्चपासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी सत्ताधारी शिवसेनेने नालेसफाई, चर भरण्याचे प्रस्ताव मंजूर केले नव्हते. प्रस्ताव मंजूर न केल्याने नालेसफाई आणि चर भरण्याची कंत्राटे देता आली नाहीत. प्रस्ताव मंजूर न झाल्याने मुंबईत पावसाचे पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात होती. पालिका आयुक्तांनी गुरुवारी ३१ मार्चला या प्रस्तावांना मंजुरी दिल्याने कामे तातडीने सुरु करुन विहीत वेळेत पूर्ण करणे प्रशासनाला शक्य होणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com