Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

मुंबई-नागपूर सुसाट; समृद्धीमुळे अंतर अवघे एवढ्या तासांवर

मुंबई (Mumbai) : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg) नागपूर (Nagpur) ते शिर्डी (Shirdi) या पहिल्या टप्पा लवकरच खुला होणार असून समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई अंतर केवळ सहा ते सात तासांवर येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.

Eknath Shinde
अबब! २२ कोटींच्या भूखंडाची ३४९ कोटीत खरेदी

विदर्भातील उद्योग धंद्यांसह विकासाच्या विविध बाबींना चालना मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे शिंदे यांनी स्वतः कार चालवत या रस्त्याची पाहणी केली.

Eknath Shinde
EXCLUSIVE : मंत्री सुभाष देसाईंचा मर्जीतील लोकांसाठी 'उद्योग'

या संदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची जबाबदारी जेव्हा माझा खांद्यावर आली, तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या विकासातील हा ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक शिवधनुष्य हाती घेण्याइतकेच आव्हानात्मक वाटत होते. परंतु सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी समाजोपयोगी, विकासात्मक काम करण्याची माझी कायम मनिषा होती. यातील एक भाग म्हणून मी नेहमी या प्रकल्पाकडे पाहतो आणि तो यशस्वीपणे उभारणे हे माझे उद्दिष्ट आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या पाहणी दौऱ्यादरम्यान खास आग्रहास्तव बऱ्याच वर्षांनी चारचाकी वाहनाचे सारथ्य करण्याची संधी मिळाली. इलेक्ट्रिक कार या महामार्गाच्या पूर्ण झालेल्या रस्त्यावरून चालवत असताना भविष्यात बदलणाऱ्या समृद्ध महाराष्ट्राचे चित्र डोळ्यांपुढे उभे राहिले आणि कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने मन सुखावले, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Eknath Shinde
समृद्धी महामार्ग 'या' महिन्यात होणार खुला; एकनाथ शिंदेची माहिती

वर्धी जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे समृद्धी महामार्ग तसेच पुलगाव जवळ वन्यप्राण्यांच्या आवागमणासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपूलाची पाहणी एकनाथ शिंदे यांनी केली. या महामार्गाचे वैशिष्ट्य असलेल्या वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी खास ८ ओव्हरपास आणि ७६ अंडरपास तयार करण्यात आले आहेत. या ओव्हरपासच्या कामांची एकनाथ शिंदेंनी पाहणी केली. वन्यजीवांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी नॉईस बॅरीयर्स बसवण्यात येणार असून आनंदाची बाब म्हणजे या ओव्हरपास वरून वन्यजीवांनी ये-जा करण्यास सुरूवात केली आहे.

Eknath Shinde
राधेश्याम मोपलवारांची खरी 'समृद्धी'; सहाव्यांदा मुदतवाढ

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची वर्धा जिल्ह्यातील लांबी ५८ किलोमीटर इतकी आहे. जिल्ह्यातील मार्ग पूर्ण बांधून झाला आहे. रस्त्याची रुंदी १२० मीटर असून तो सहापदरी आहे. वर्धा, सेलु आणि आर्वी या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून एकून ७८२ हेक्टर इतकी जमीन महामार्गासाठी संपादीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात या मार्गावर २ हजार ७६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात या मार्गावर विनाअडथडा वाहतुकीसाठी ५ मोठे, २७ लहान पुलांसह ९ उड्डाणपूल बांधण्यात आले आहे. येळाकेळी व विरूळ येथे इंटरचेंजेस देण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांच्या आवागमणासाठी दोन विशेष उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. हा मार्ग विदर्भातील जनतेसाठी फायद्याचा ठरणारा आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com