मुंबईत चार वर्षात सव्वादोन लाख खड्डे; यापुढे खड्डे पडल्यास कंत्राटदाराला रोख दंड

Pothole
PotholeTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवर गेल्या चार वर्षात तब्बल २ लाख २० हजार खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी महापालिकेला वारंवार टेंडर काढावी लागतात, त्याऐवजी महापालिका आता थेट रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याच्या पवित्र्यात आहे. 'हमी कालावधी'त रस्त्यांवर खड्डे पडल्यास कंत्राटदाराला रोख दंड करण्याचा विचार महापालिका स्तरावर सुरू आहे.

Pothole
Mumbai : बॉडी बॅग (शव पिशव्या) खरेदी प्रकरणात न्यायालयाकडून 'एसीबी' फैलावर

मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाकडून पावसाळ्याआधी मे महिन्यापासूनच खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. खड्डे भरणाऱ्या कंत्राटदारांकडून सप्टेंबरपर्यंत त्याचे काम जोमाने सुरू असते. मात्र खड्डे काही केल्या कमी होत नाहीत आणि पुन्हा-पुन्हा खड्ड्यांचा सामना मुंबईकरांना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आगामी काळात रस्त्यांवर खड्डे पडूच नये, यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. यापुढे 'हमी कालावधी'त खड्डे पडल्यास कंत्राटदाराला रोख दंड करण्यात येईल. आगामी काळात देण्यात येणाऱ्या टेंडरमध्ये या अटीचा समावेश करावा, असा विचार महानगरपालिकेचा आहे. त्यामुळे मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

Pothole
BMC मालमत्ता कर : 10 बड्या उद्योजकांकडे 80 टक्के थकबाकी; आमदारांच्या सोसायटीचाही समावेश

मास्टिक तंत्रज्ञानामुळे खड्डे उखडत नसल्यामुळे मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्याआधी दुरुस्ती, खड्डे बुजवण्याचे काम करताना केवळ खड्डे न बुजवता मास्टिक सरफेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. मुंबई पालिकेच्या अखत्यारीत सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. हे सर्व रस्ते काँक्रिटचे करण्याचे धोरणही राबवण्यात येत आहे. यामध्ये सुमारे ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी महानगरपालिकेकडून कार्यवाही सुरू आहे. रस्ते बांधणीनंतर त्या रस्त्यांचा विशिष्ट हमी कालावधी कंत्राटदाराकडून दिला जातो. 'हमी कालावधी'त रस्त्याची जबाबदारी कंत्राटदाराची असते.

मागील वर्षांतील खड्डे -
२०२० - ६५ हजार ६१७

२०२१ - ४३ हजार ४७८

२०२२ - ३८ हजार ३१०

२०२३ - ७१ हजार ७७३ (सप्टेंबरपर्यंत) 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com