Budget Session : पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रकल्पांवर निधीचा वर्षाव; काय आहे अर्थसंकल्पात पाहा...

Budget Session : पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रकल्पांवर निधीचा वर्षाव; काय आहे अर्थसंकल्पात पाहा...
Published on

मुंबई (Mumbai) : उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवार)राज्याचा 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करताना अनेक मोठ्या प्रकल्पांच्या घोषणा करत, प्रमुख प्रकल्पांसाठी निधीची तरतूद केली. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांचा हा अकरावा अर्थसंकल्प सादर केला.

Budget Session : पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रकल्पांवर निधीचा वर्षाव; काय आहे अर्थसंकल्पात पाहा...
Mumbai : नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत असा आहे सरकारचा प्लॅन?

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे...

- अमरावती विभागात बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून 31 मार्च 2025 पासून प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे ,147 कोटी रुपये किमतीची कामे प्रगतीपथावर

- गडचिरोलीत नवीन विमानतळाच्या सर्वेक्षणाची कामे सुरू केली आहेत

अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल

- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या सहा हजार डिझेल बसेस रूपांतर सीएनजी व एलजी मध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे

- नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे

- सार्वजनिक बांधकाम रस्त रस्ते विभागास 19 हजार 936 कोटी, परिवहन विभागात तीन हजार सहाशे 10 कोटी रुपये, नगर विकास विभागात दहा हजार 729 कोटी, ग्रामविकास विभागास 11480 कोटी, पर्यावरण व वातावरण बदल विभागास 245 कोटी रुपये, ऊर्जा विभागास 21534 कोटी रुपये प्रस्थापित आहे.

- नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खाजगी सहभागातून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

- प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेत त्यामुळे वृध्दी होईल

- विदर्भाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल.

- 6000 डिझेल बसचं रुपांतर सीएनजी आणि एलएनजीमध्ये करणार

- 2025-26 मध्ये बंदरे विकास विभागास 484 कोटी

- सार्वजनिक बांधकाम विभागास19936 कोटी , परिवहन 3610, नगरविकास 10629, ग्रामविकास 11480 , पर्यावरण विभाग

- उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

- पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे

- तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे

- या प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

- महानगरातील प्रवाशांना वातानुकुलित प्रवाससाठी मेट्रोचे प्रकल्प कार्यान्वित, मुंबई पुण्यात 64 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होतील. पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग तयार करणार

- नागपूर मेट्रोचा पहिला 40 किमीचा टप्पा पूर्ण झाला आहे. ठाणे मेट्रो, पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे.

- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबईतील विमानतळाला जोडणारी मेट्रो सेवा निर्माण करणार

- नवी मंबईतील विमान तळाचं काम 85 टक्के काम पूर्ण, देशांतर्गत विमानसेवा सुरु आहे.

- नागपूरच्या विमानतळाचा खासगी सहभगातून विकास

- नानाजी देशमुख प्रकल्पासाठी 351 कोटी 42 प्रस्तावित

एआय वापर धोरण आखणार

- शेतकऱ्यांना पीक नियोजन, उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादकता वाढवणं, शेतमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, यासाठी एआय वापरणार, पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांसाठी प्रकल्प सुरु होणार, यासाठी 500 कोटी रुपये

- कालवे वितरण सुधारण्यासाठी 5000 कोटीची कामे मंजूर

- जलयुक्त शिवार 2.0 यासाठी 5518 गावात 4227 कोटींची कामंहाती घेण्यात आली आहे. यातील कामं 2026 पर्यंत पूर्ण होतील.

- राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5 हजार कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत.

- मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजनेत डिसेंबर 7978 कोटींची सवलत

- जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत ५ हजार ८१8 गावांमध्ये 4 हजार 227 कोटी रुपये किंमतीची 1 लाख 48 हजार 888 कामे हाती घेण्यात आली आहेत. अभियानातील सर्व कामे मार्च, 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

- मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजनेत डिसेंबर 7978 कोटींची सवलत देण्यात आली आहे

- नवी मुंबईत “महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार”, मुंबईत मरोळमध्ये “आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार” तसेच आरमोरी, जिल्हा गडचिरोली येथे रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ स्थापन करण्यात येणार आहे.

- जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत 2 लाख 90 हजार 129 सौर कृषीपंप स्थापित करण्यात आले आहेत. सध्या प्रत्येक दिवशी सुमारे १ हजार पंप या गतीने सौर कृषि पंपांची स्थापना करण्यात येत आहे.

- रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत 10 हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे

- नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाव्दारे नाशिक व जळगाव जिल्हयातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 7 हजार 500 कोटी रूपये आहे.

- दमणगंगा -एकदरे -गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील 9 हजार 766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल

- नाशिक जिल्ह्यातील 2 हजार 987 हेक्टर क्षेत्रालाही यामुळे सिंचनाचा लाभ होईल, या प्रकल्पाची अंदाजित किंमत 2 हजार 300 कोटी रूपये आहे

- 27 जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी वीज योजना, ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार

- 2 लाख 90129 सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत. बी बियाणं यंत्र सामृग्रीसाठी शेत व पाणंद रस्त्याच्या विकासासाठी योजना, रामटेकच्या धर्तीवर विकास

- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत २ लाख १३ हजार ६२५ लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी २५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे

- मुंबई, नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांसाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित-सुमारे १० लाख प्रवाशांचा रोज लाभ

- गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12 हजार 332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण, प्रकल्प जून, 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

- सांगली जिल्ह्यातील 200 मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपसा सिंचन योजना-1 हजार 594 कोटी रुपये किंमतीच्या सौरऊर्जा प्रकल्पास मान्यता

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com