Good News! आता राज्याच्या उपराजधानीत होणार Falcon 2000 विमानांची निर्मिती

फाल्कन २००० जेट विमानांची निर्मिती नागपुरात
Falcon 2000 Jet, NagpurTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पॅरिस येथे आयोजित एअर शोदरम्यान (Paris Air Show), डसॉल्ट एव्हिएशन (dassault aviation) आणि रिलायन्स एरोस्पेस लि. (Reliance Aerospace) यांच्यात फाल्कन २००० जेटसच्या (Falcon 2000 Jet) निर्मितीसाठी ऐतिहासिक करार झाला असून, फ्रान्सच्या बाहेर अशाप्रकारची ही निर्मिती प्रथमच होणार आहे. (Falcon 2000 Jet production facility in Nagpur soon)

फाल्कन २००० जेट विमानांची निर्मिती नागपुरात
स्टार एअरवेजला ग्रीन सिग्नल! सोलापुरातून देशातील 'त्या' मोठ्या शहरासाठी सुरू होणार विमानसेवा

ही निर्मिती नागपुरात होणार असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून या कराराचे स्वागत केले आहे. नागपूर, मिहानमध्ये होत असलेल्या या उत्पादनातून भारताच्या हवाई उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया धोरणालाही मोठा ‘बूस्ट’ मिळेल. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. नागपुरात संरक्षण उत्पादनाच्या दृष्टीने अनेक सुविधा निर्मितीचे काम आम्ही केले. त्यादृष्टीने हा एक माईलस्टोन करार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

फाल्कन २००० जेट विमानांची निर्मिती नागपुरात
‘त्या’ तीन प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार

भारतासाठी आणि जागतिक बाजारपेठेसाठी फाल्कन २००० ची संपूर्णत: निर्मिती आता नागपुरात होणार आहे. या करारामुळे अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझील या देशांच्या पंक्तीत भारत गेला आहे. नागपुरातील डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (डीआरएएल) हे सेंटर ऑफ एक्सलन्स ठरेल. फाल्कन ८ एक्स आणि ६ एक्सची असेम्ब्ली सुद्धा तेथेच होईल. यामुळे पहिले मेड इन इंडिया फाल्कन २०२८ पर्यंत नागपुरात तयार होईल.

फाल्कन २००० जेट विमानांची निर्मिती नागपुरात
कात्रज चौकातील अडथळ्यांची शर्यत कधी संपणार? उड्डाणपुलाच्या कामाला आता तिसऱ्यांदा मुदतवाढ?

२०१७ मध्ये या डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेसची (डीआरएएल) स्थापना करण्यात आली होती. आता नव्या उत्पादन सुविधेमुळे हजारो तंत्रज्ञ आणि अभियंते यांना नागपुरात रोजगार उपलब्ध होणार आहे. डसॉल्ट एव्हिएशन ही संरक्षण दलाला लागणाऱ्या राफेलसह, फाल्कनची निर्मिती करणारी जगातील अगग्रण्य कंपनी असून, आतापर्यंत त्यांनी १० हजारावर लष्करी आणि नागरी विमानांची निर्मिती केली आहे. सुमारे ९० देशांना त्याचा पुरवठा केला जातो.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com