Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

'2030 पर्यंत आमचं सरकार...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

Published on

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्रामध्ये विविध प्रकल्प आणि योजना राबवित असताना, विकासाची एकात्मिक प्रगती साध्य करीत असताना शेवटच्या घटकापर्यंत ही मदत पोहोचणे यावर भर देण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, महाराष्ट्रात आणि मुंबईत मेट्रो सेवा सुरू करणे, बुलेट ट्रेन या प्रकल्पांमुळे मुंबईला देशाच्या इतर भागांशी जोडले जाईल. महाराष्ट्राच्या प्रगतीचा साक्षीदार ठरणारा समृध्दी महामार्ग हा 700 किमी असून, केवळ 9 महिन्यांत राज्य शासनामार्फत जमिन अधिग्रहण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉल निर्मिती आणि वापर यावर भर देण्यात येणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

Devendra Fadnavis
शिंदे सरकारचा ‘महाविकास’ला हाय व्होल्टेज झटका; ५ हजार कोटींची...

मुंबईत शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या 'संकल्प ते सिध्दी (नवा भारत, नवे संकल्प)' परिषदेत ते बोलत होते. या परिषदेस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह सीआयआयचे पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.

Devendra Fadnavis
पुणे महापालिका समाविष्ट गावांतील पाणीपुरवठ्यासाठी करणार एवढा खर्च

फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला. केंद्र शासनाबरोबरच आमचे शासनसुध्दा येणाऱ्या काळात नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने कसे पूर्ण होईल यासाठी काम करीत आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्याबरोबरच मुंबई मेट्रोचे कामेही प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर असेल. मुंबई ही केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाची आर्थिक राजधानी असून, महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे पॉवरहाऊस आहे. पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि नविनताभिमुख बाबी एकत्र करून 2030 पूर्वी महाराष्ट्राला ट्रिलीअन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

Devendra Fadnavis
'खंबाटकी'ची कटकट लवकरच संपणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

या कार्यक्रमात बोलताना मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, भारताच्या स्वातंत्र्याचे महत्त्व आजच्या पिढीला समजावे यासाठीच केंद्र शासनाकडून आजादी का अमृतमहोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. देशाने गेल्या 75 वर्षांत वेगवेगळ्या क्षेत्रात केलेली प्रगती ही महत्त्वपूर्ण आहेच, पण येणाऱ्या 25 वर्षांत कोणत्या क्षेत्रावर अधिक लक्ष देणे आवश्यक ठरेल याबाबतही नियोजन करणे शक्य होणार आहे.

Tendernama
www.tendernama.com