Devendra Fadnavis: धुळ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय दिली गुड न्यूज?

Devendra Fanavis
Devendra FanavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai): धुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नागरी सुविधा आणि उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब (ड्राय पोर्ट व स्टोरेजसाठी विशेष टर्मिनल) उभारणे अत्यावश्यक आहे. यासाठी तांत्रिक, आर्थिक व लॉजिस्टिक दृष्टीने व्यवहार्यता तपासावी व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हब उभारण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.

Devendra Fanavis
Exclusive: राज्यातील कंत्राटदारांमध्ये का उडाली खळबळ? कोट्यवधींचे बनावट GR उजेडात

धुळे महापालिकेच्या विविध प्रकल्पांबाबत विधानभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धुळे येथे उद्योगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच देवपूर, वलवाडी व सखल भागात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय साधावा.

धुळे शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन डीआय पाईपलाईन टाकणे, औद्योगिक प्रकल्पांसाठी सौर प्रकल्प बॅटरी स्टोरेजसह उभारणे, भुयारी मलनिस्सारण योजनेसाठी निधी मंजूर करणे याबाबतही सूचना दिल्या.

Devendra Fanavis
Exclusive: देवेंद्र फडणवीसांच्या आदेशालाच 'सामाजिक न्याय'कडून वाटाण्याच्या अक्षता!

तसेच, धुळे शहरास दरवर्षी पाणी वितरण व पथदिव्यांसाठी ३२ ते ३३ कोटी रुपयांचा वीज खर्च होत असून, हा भार कमी करण्यासाठी योग्य जागेवर सौर प्रकल्प उभारावेत. शहराचा विस्तार ४६.४६ चौ.कि.मी. वरून १०१.०८ चौ.कि.मी. पर्यंत झाला आहे. त्यामुळे वाढलेल्या हद्दीतील मुलभूत सोयींसाठी नगरोत्थान योजनेतून निधी मंजूर करावा, अशीही सूचना त्यांनी दिल्या.

याशिवाय, चाळीसगाव रोडलगत म्हाडाच्या जागेवर शॉपिंग सेंटर उभारणे आणि मौजे धुळे येथे नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले.

Devendra Fanavis
Nagpur: फडणवीसांच्या नागपुरातील 'त्या' 2 उड्डाणपुलांची सरकार करणार चौकशी

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार अनुप अग्रवाल, अपर मुख्य सचिव असिम गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com