Nagpur: फडणवीसांच्या नागपुरातील 'त्या' 2 उड्डाणपुलांची सरकार करणार चौकशी

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai): नागपूर शहरातील शांतीनगर कावळापेठ रेल्वे उड्डाण पूल आणि कळमना ते राजीव गांधीनगर पुलाच्या आराखड्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता स्तरावर चौकशी केली जाईल. या चौकशीत दोषी आढळणाऱ्या एजन्सी व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

Devendra Fadnavis
Exclusive: देवेंद्र फडणवीसांच्या आदेशालाच 'सामाजिक न्याय'कडून वाटाण्याच्या अक्षता!

विधानसभा सदस्य नितीन राऊत यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य कृष्णा खोपडे आणि सदस्य प्रवीण दटके यांनी सहभाग घेतला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी सांगितले की, शांतीनगर कावळापेठ रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे काम मार्च २०२० मध्ये पूर्ण करण्यात आले असून हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. या पुलाखालील भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. तर कळमना ते राजीव गांधीनगर येथील रेल्वे क्रॉसिंग वरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम हे रेल्वे विभागाने मंजूर केलेल्या उपलब्ध जागेमध्ये मंजुरीनुसार पूर्ण करण्यात आले आहे. हा उड्डाणपूल २५ एप्रिल २०२५ रोजी हलक्या वाहनासाठी खुला करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis
पुणे महापालिकेला आपल्याच आश्वासनाचा विसर; तब्बल 21 कोटी खर्चूनही...

कामठी शहराकडील वाहतूक अस्तित्वातील नागपूर छिंदवाडा रेल्वे लाईन व नागपूर शहरातील अंतर्गत वळण मार्ग ओलांडून कावळापेठ रेल्वे उड्डाण पुलास जोडणे तसेच अंतर्गत वळण मार्गावरून नागपूर छिंदवाडा रेल्वे लाईन ओलांडून कामठीकडे जाणाऱ्या व कामठीकडून नागपूर छिंदवाडा रेल्वे लाईन ओलांडून अंतर्गत वळण मार्गाला जोडणे, अशा प्रकारच्या रेल्वे उड्डाणपुलाचा वाव अंतर्भूत होता.

त्या अनुषंगाने नागपूर येथील कळमना ते राजीव गांधीनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम करताना कावळापेठ जंक्शनच्या ठिकाणी उजव्या बाजूस धार्मिक स्थळ व डाव्या बाजूस रेल्वे लाईन असल्यामुळे उपलब्ध असलेली जागा लक्षात घेऊनच हा पूल कावळा पेठ रेल्वे उड्डाण पुलास जोडण्यात आला होता.

Devendra Fadnavis
Pune: 'स्मार्ट' ठेकेदाराकडून 'स्मार्ट सिटी'च्या डोळ्यांत धूळफेक

कळमना ते राजीव गांधी येथील रेल्वे क्रॉसिंग व रेल्वे उड्डाणपूल २५ एप्रिल २०२५ रोजी वाहतुकीस खुला केल्यानंतर अंतर्गत वळण मार्ग व कावळा पेठ उड्डाणपूलास जोडणाऱ्या ठिकाणी (जंक्शन) वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता वाहने सुरळीतपणे वळवण्यासाठी या पुलांची रुंदी जास्त असणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार मुख्य अभियंता यांनी प्रस्तावित केलेल्या  तीन जंक्शनच्या ठिकाणी अतिरिक्त रुंदीकरण करण्यासाठी २० कोटी रुपये खर्च करून ती पुलांचे रुंदीकरणाचे काम करण्यात येणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com