नववर्षांत मुंबईकरांना दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची भेट; एमटीएचएल पाठोपाठ आता...

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून मुक्तता करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट नव्या वर्षांत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रविवारी सांगितले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड या दोन्ही प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. एमटीएचएल पाठोपाठ कोस्टलरोडचा पहिला टप्पा जानेवारी महिन्याच्या अखेरीस खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

Eknath Shinde
मोदींच्याच हस्ते 'एमटीएचएल'चे लोकार्पण; मुख्यमंत्र्यांकडून तयारीची पाहणी

सलग दुसऱ्या दिवशी मुंबई डीप क्लीन मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी झाले. सकाळपासून चर्नी रोड, मरीन ड्राईव्ह, नरीमन पॉईंट याठिकाणी ही मोहिम राबवतानाचा मुख्यमंत्र्यांनी त्याचा विस्तार वाढवत एमटीएचएल आणि रायगड जिल्ह्यातील चिर्ले  येथेही स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. सकाळी सुमारे साडेआठच्या सुमारास सुरू झालेली ही मोहिम दुपारी दीडपर्यंत सुरू होती. नेपियन्सी रोडवरील प्रियदर्शनी पार्क जवळील कोस्टल रोडच्या जुळ्या भूमिगत बोगद्यापासून मुख्यमंत्र्यांनी मोहिमेला सुरूवात केली. वरळीकडून मुंबईकडे जाणाऱ्या या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून जानेवारी महिन्याच्या अखेरीस तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

Eknath Shinde
Eknath Shinde : कोकणात लवकरच 20 हजार कोटींचा उद्योग

कोस्टल रोड बोगद्यात देशात प्रथमच सकार्डो प्रणाली -
भारतात प्रथमच सकार्डो ही अत्याधुनिक वायूविजन प्रणाली बोगद्यात बसविण्यात आली आहे. त्यामुळे बोगद्यात धुर न साठता तो बाहेर फेकण्याचे काम या प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. या बोगद्यात आपत्कालीन उपाययोजना म्हणून प्रत्येक ३०० मीटरवर छेद बोगद्यांची व्यवस्था असून उपयोगिता सेवेसाठी बोगद्यामध्ये यूटिलिटी बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या बोगद्याची पाहणी करत त्यातून गिरगाव चौपाटीपर्यंत प्रवास केला.

Eknath Shinde
Mumbai : 'त्या' 734 इमारतींच्या पुर्नविकासासाठी म्हाडा मिशन मोडवर; लवकरच टेंडर

कोस्टल रोड बोगद्याचा दुसरा टप्पा मे अखेरीस -
कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील बोगद्याचे काम झाले असून दुसऱ्या टप्प्यातील बोगदा मे अखेरपर्यंत पूर्ण होईल. या बोगद्याचा आकार देशातील सर्वात मोठा असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. कोस्टल रोडवर टोल नाही असे सांगत मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणारा हा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईकरांसाठी एमटीएचएल आणि कोस्टल रोड हे दोन्ही गेमचेंजर असून ह्या नवीन वर्षांत दोन्ही प्रकल्प सामान्यांना खुले करून त्यांना नव्या वर्षांची भेट मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com