सरकारचा मोठा निर्णय; अटल सेतूवर सवलतीच्या दराने आणखी वर्षभर टोल

Atal Setu
Atal SetuTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) होते.

Atal Setu
Mumbai : 'त्या' 14 हजार कोटी खर्चाच्या प्रकल्पामुळे वेळेची 70 टक्के तर इंधनात 34 टक्के बचत

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता यापूर्वी ४ जानेवारी २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या दराच्या ५० टक्के सवलतीच्या दराने पथकर (कमीत कमी २५० रुपये इतका) आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता. या दराचा एक वर्षानंतर आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक वर्षभर म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सध्या सुरु असलेल्या सवलतीच्या दरानेच पथकर आकारणीस मान्यता देण्यात आली.

Atal Setu
Mumbai : 'केईएम' रुग्णालयात उभी राहतेय 21 मजली इमारत; 100 कोटींचे टेंडर 'त्या' कंपनीच्या खिशात

मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात आलेला हा सुमारे २२ किलोमीटर लांबीचा अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू प्रकल्प १३ जानेवारी २०२४ पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. या सागरी सेतूवर कारसाठी एकवेळ २५० रुपयांचा तर अवजड वाहनांसाठी एकवेळ १,५८० आणि मासिक तब्बल ७९ हजार रुपये इतका टोल आकारला जात आहे. या सागरी सेतुमुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करता येत आहे. हा सागरी सेतू उभारण्यासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आलंय. ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला हा देशातील पहिला मार्ग आहे. या पुलावर कार, टॅक्सी, मिनी बस, हलकी वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, छोटे ट्रक प्रवास करु शकतात. प्रत्येक वाहनाकडून वेगवेगळा टोल आकारला जाणार आहे. त्यानुसार सिंगल, रिटर्न, डेली आणि मासिक पास उपलब्ध करुन दिला आहे. कारसाठी सिंगल टोल २५० रुपये आणि मासिक पास १२,५०० रुपयांचा आहे. तर, अवजड वाहनासाठी सिंगल टोल १,५८० रुपये तर, मासिक पास तब्बल ७९ हजार रुपये इतका आहे. अटल सागरी सेतूवर मोटर सायकल, मोपेड, तीन चाकी टेम्पो, रिक्षा, ट्रॅक्टर, ट्रॉलीला परवानगी नाही.

३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचा टोल दर -

वाहने / सिंगल जर्नी / रिटर्न जर्नी / डेली पास / मंथली पास

कार / २५० / ३७५ / ६२५ / १२५००

एलसीव्ही / मिनी बस / ४०० / ६०० / १००० / २००००

बस/२-अ‍ॅक्सेल ट्रक / ८३० / १२४५ / २०७५ / ४१५००

एमएव्ही (थ्री अ‍ॅक्सेल) / ९०५ / १३६० / २२६५ / ४५२५०

एमएव्ही ( ४ टू ६ अ‍ॅक्सेल) १३०० / १९५० / ३२५० / ६५०००

ओव्हरसीझ / १५८० / २३७० / ३९५० / ७९००० 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com