Mumbai : बेस्टच्या 2400 ई-बसचे टेंडर 'ऑलेक्ट्रा'च्या खिशात; 4 हजार कोटी...

BEST Bus Mumbai
BEST Bus MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : बेस्ट बसेसच्या ताफ्यात आगामी दीड वर्षात २,४०० नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक बसेस दाखल होत आहेत. 'ऑलेक्ट्रा ग्रीनटेक' लिमिटेडने (ईव्हे ट्रान्स) बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात 'बेस्ट'कडून २४०० इलेक्ट्रिक बस पुरवठ्याचे टेंडर खिशात टाकले आहे. ४ हजार कोटी इतक्या किंमतीचे हे टेंडर आहे. 'ईव्हीईवाय'ला (Evey Trans Private Limited (EVEY) बेस्टकडून लेटर ऑफ अवॉर्ड (LOA) प्राप्त झाले आहे.

BEST Bus Mumbai
Devendra Fadnavis : स्वयंपुनर्विकास धोरणामुळे मुंबईत 5 लाख कुटुंबांची स्वप्नपूर्ती

दरम्यान, बेस्टची ऑर्डर मिळाल्याच्या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. या शेअरने इंट्राडेमध्ये 7 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आणि 2222 रुपयांचा उच्चांक गाठला. कंपनीच्या स्टॉकमध्ये गेल्या तीन महिन्यांत 75 टक्के इतकी दणदणीत वाढ झाली आहे. बेस्टच्या टेंडरनुसार कंपनीमार्फत १२ वर्षांच्या कालावधीसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC)/ ऑपेक्स (Opex) मॉडेलवर २४०० इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यात येईल. १८ महिन्यांच्या कालावधीत बसेस वितरित केल्या जातील. 'ऑलेक्ट्रा' या बसेसची देखभाल देखील कराराच्या कालावधीत करेल.

BEST Bus Mumbai
Eknath Shinde : मोठी बातमी! सरकारने का कमी केला टेंडर प्रक्रियेचा कालावधी?

इलेक्ट्रिक मोबिलिटी मध्ये अग्रगण्य कंपनी असलेली  'ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड' या करारानुसार १२ मीटर आणि ९ मीटरच्या वातानुकूलित बसेस पुरवणार आहे. मुंबईत बेस्टसाठी आधीच कंपनीच्या ४० इलेक्ट्रिक बसेस धावत आहेत. १२ मीटरच्या बसेसची आसनक्षमता ४४ प्रवाशांची आणि ९ मीटर बसेसची आसनक्षमता ३४ प्रवासी इतकी आहे. या सर्व ई-बसेस वातानुकूलित स्वरुपातील आहेत. या ई-बसेस प्रदूषण विरहित, पर्यावरण पूरक, वातानुकुलित व आवाज विरहित आहेत. बसची रंगसंगती सुद्धा आकर्षक आहे. या बसेस एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे २०० कि.मी. अंतर धावू शकतात. ही बस पूर्ण चार्ज करण्यासाठी सुमारे २ तासांचा वेळ लागतो.

BEST Bus Mumbai
Mumbai : कोस्टल रोड 100 टक्के मजबूत; अशी झाली यशस्वी परीक्षा

या ई-बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, फ्रंट आणि रिअर एअर सस्पेंशन, लक्झरी सीट्स, एसी बसेस, डिस्क ब्रेक्स आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. बेस्टने मुंबई शहरात मिशन १० हजार इलेक्ट्रिक बसचे उद्धिष्ट निश्चित केले आहे. बेस्ट प्रशासनाच्या २४०० बसेसच्या टेंडर प्रक्रियेसाठी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक, स्वीच मोबिलीटी, पीएमआय, चार्टर्ड स्पीड, जेबीएम, टाटा मोटर, कॉसीस ई मोबिलीटी, कॉन्टीनेंटल या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी तीन कंपन्या टेंडर प्रक्रियेत पात्र ठरल्या होत्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५,१५० वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्यांचे टेंडर सुद्धा 'ऑलेक्ट्रा ग्रीनटेक' (ईव्हे ट्रान्स) कंपनीला मिळाले आहे.

BEST Bus Mumbai
Mumbai-Pune आणखी जवळ येणार; 'त्या' मार्गासाठी 3 हजार कोटींचे टेंडर

सध्या, 'ईव्हे ट्रान्स' आणि 'ऑलेक्ट्रा ग्रीनटेक' लिमिटेड देशातील विविध राज्य परिवहन उपक्रमात (STU) इलेक्ट्रिक बसेस चालवत आहेत. पुणे (PMPML), हैदराबाद, गोवा, डेहराडून, सुरत, आणि अहमदाबाद, सिल्वासा आणि नागपूर या शहरातील वाहतूक व्यवस्थेत या बसेस आपल्या सेवा बजावत आहेत.

प्रत्येक वर्षी पंधराशे ई बसचे उत्पादन -
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला सातत्याने मोठी टेंडर मिळत आहेत. कंपनीची वार्षिक 1500 ई बसेस तयार करण्याची क्षमता आहे. बॅटरी तंत्रज्ञानातील अग्रगण्य चीनी इलेक्ट्रिक कंपनी 'बीवायडी' (BYD) ही कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला बॅटरीसंदर्भात तांत्रिक सहकार्य करते. कंपनी अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक बसेस बनवते. सप्टेंबर 2023 पर्यंत कंपनीकडे 8209 ई-बसेसच्या ऑर्डर आहेत. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com