अबब! 300 कोटी रुपयांचे बजेट तब्बल 2,963 कोटींवर गेले?

Alibagh : अलिबाग आणि उरण या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या खाडीपुलाची चर्चा 1970 पासूनच सुरू झाली होती. त्यानंतर 1980 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी या प्रकल्पासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली होती.
Revas Karanja Bridge
Revas Karanja BridgeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) माध्यमातून अलिबाग तालुक्यातील रेवस ते उरण तालुक्यातील करंजादरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम नुकतेच हाती घेण्यात आले आहे.

यासाठी 2,963 कोटी रुपयांचे टेंडर ‘अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला देण्यात आले असून, कंपनी पुढील 3 वर्षांत हे काम पूर्ण करणार आहे. खाडी पूल उभारण्यास झालेल्या विलंबामुळे 44 वर्षांत खाडीपुलाचा खर्च ३०० कोटी रुपयांवरून तब्बल 2 हजार 663 कोटींनी वाढला आहे.

Revas Karanja Bridge
Pune : कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामामुळे पीएमपीने केले बदल; आता...

अलिबाग आणि उरण या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या खाडीपुलाची चर्चा 1970 पासूनच सुरू झाली होती. त्यानंतर 1980 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी या प्रकल्पासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली होती.

काही कामेही सुरू झाली होती; परंतु बॅ. अंतुले मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर 1982 मध्ये लगेचच हा प्रकल्प गुंडाळण्यात आला. त्यानंतर रेवस-करंजा खाडी पूल हे स्वप्नच राहिले.

Revas Karanja Bridge
Mumbai : MMRDA चा 300 कोटींचा 'तो' प्रकल्प का सापडला वादात? टेंडर वाटपात घोळ?

रेवस ते करंजा हा पूल दोन किमी लांबीचा असून, 4 लेन पूल उभारण्यात येणार आहे. या पुलामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते अलिबागदरम्यानचे अंतर 25 किलोमीटरने कमी होणार आहे. या पुलावरून तब्बल 80 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने धावतील, असे डिझाईन विकसित करण्यात येत आहे.

पुलावर दोन्ही बाजूला 1.5 मीटर रुंद पादचारी पदपथ समाविष्ट करण्यात आले आहेत. पुलाला जोडण्यासाठी करंजा येथे 5.13 किलोमीटर लांबीचा; तर रेवस येथे 1.71 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात येणार आहे.

Revas Karanja Bridge
Bullet Train : बुलेट ट्रेनसाठी ट्रॅक निर्मिती युद्धपातळीवर; सुरतमध्ये 'तो' सर्वात मोठा कारखाना सुरू

रेवस-करंजादरम्यान रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी करंजा व रेवस येथे रो रो सेवेच्या अनुषंगाने 2018 पासून कामे हाती घेण्यात आली आहेत. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून जेट्टीचे काम करण्यात येत आहे. यातील करंजा बंदरावरील जेट्टीचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे झाली आहेत. यातील जेट्टीची दुरवस्था होऊ लागली आहे. मात्र या जलमार्गावरील रेवस जेट्टीचे काम अनेक कारणांनी रखडले आहे.

हे काम पूर्ण करण्यासाठी नव्याने टेंडर मागवण्यात आली आहेत. रेवस जेट्टी येथील कामाचा खर्च 25 कोटींवरून 30 कोटींवर पोहोचला आहे. केंद्राच्या सागरमाला योजनेंतर्गत रेवस व करंजा या ठिकाणी जेट्टी उभारणीपासून रस्ता, टर्मिनल, पार्किंग सेवा अशा अनेक सुविधा निर्माण केल्या जात आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com