
पुणे (Pune) : कात्रज चौकात उड्डाणपुलाचे (Katraj Chowk Flyover) काम सुरू आहे. त्यामुळे कात्रज येथे असणाऱ्या पीएमपीच्या बसस्थानकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे.
२ डिसेंबरच्या रात्री १२ पासून हा बदल होणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.
हा होणार बदल
१. कात्रज-कोंढवा रस्ता बस स्थानकावरून सुटणाऱ्या बस : क्रमांक १४०अ, १८८, २०९, २९१, के-१६ व एपी-२ या मार्गाच्या सर्व बसेस राजस सोसायटी चौकातून सुटतील.
२. कात्रज बायपास बस स्थानकावरून सुटणाऱ्या बस क्र. ४३, ४३अ, ४४, ४५, २१४
व २२८ या बसेस वंडर सिटीसमोरील सेवा रस्त्यावरून सुटतील.
३) कात्रज सर्पोद्यान बसस्थानक ः मार्ग क्र. ६१, २९२, २९३, २९६ व २९६अ या मार्गाच्या सर्व बसेस गुजरवाडी बसस्थानक येथून सुटतील.
४) कात्रज पोलिस चौकी बसस्थानक ः मार्ग क्र. २४, २४अ व २३५ या बस सर्पोद्यान येथून सुटतील.
५) कात्रज रोड बसस्थानक ः कात्रज रोड बसस्थानकावरून सुटणाऱ्या बसमार्ग क्र. २अ, ११क, ३०१, ३०१अ, रातराणी बसेस कात्रज डेपोतून संचलनात राहतील.
६) गुजरवाडी-कात्रज बसस्थानक ः गुजरवाडी-कात्रज बसस्थानकावरून सुटणारे बसमार्ग क्र. ४२, ९०, १०३, १०३म,
२९८, २९९ व ३३९ या मार्गाच्या सर्व बसेस कात्रज दूध डेअरीजवळ असणाऱ्या कचरा डेपोपासून संचलनात राहतील.
७) बसमार्ग क्र. २९४, २९५ व २९७ हे उड्डाणपुलाच्या कामामुळे तूर्तास बंद ठेवण्यात येणार आहेत.