टेलिकॉम घोटाळ्याने उद्ध्वस्त केले 'या' नेत्याचे राजकीय करिअर

Sukhram
SukhramTendernama

हिमाचल प्रदेशच्या राजकारणात पंडीत सुखराम या कॉंग्रेसच्या नेत्याचा अनेक वर्षे दबदबा होता. तब्बल सात वेळा या माणसाने आमदारकी भूषविली. तर तीन वेळा खासदार म्हणून हिमाचलमधील मंडी लोकसभा मतदार संघाचे त्यांनी संसदेत प्रतिनिधीत्वही केले. परंतु, राजकीय नेता कितीही मोठा असो, त्याने केलेली एक चूकही त्याचे राजकीय करियर उद्ध्व करू शकते याचे उत्तम उदाहर म्हणजे सुखराम!

Sukhram
'माती गैरव्यवहार'मुळे कोणी खाल्ली माती?

टेलिकॉम गैरव्यवहार म्हणले की सुखराम यांचे नाव आठवणार नाही असे होत नाही. आधीच वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असलेल्या सुखराम यांना टेलिकॉम गैरव्यवहारामुळे देशभर प्रसिद्धी मिळाली. विरोधकांनी हे प्रकरण एवढे 'हिट' केले की, सुखराम यांचे हात या प्रकरणात कसे बरबटले आहेत, हे देशातील लहान लहान पोरेही सांगू लागली.

Sukhram
चारा गैरव्यवहाराने अशी संपविली लालूंची सद्दी

टेलिकॉम गैरव्यवहाराचे हे प्रकरण देशभरात प्रचंड गाजले. सुखराम यांनी दूरसंचार मंत्री असताना आपल्या पदाचा दुरुपयोग करत हरियाना टेलिकॉम लि. (एचटीएल) या खासगी कंपनीवर विशेष मेहरबानी केली. या कंपनीला पॉलिथिन इन्सुलेटेड जेली फिल्डच्या साडे तीन लाख किलोमीटर (एलसीकेएम) केबलचा पुरवठा करण्याचे कंत्राट दिले. हे कंत्राट सुमारे ३० कोटी रुपयांचे होते.

Sukhram
आदर्श घोटाळा अन् अशोक चव्हाणांना गमवावे लागले मुख्यमंत्रीपद

सीबीआयने १९९८ मध्ये टेलिकॉम गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. एचटीएल कंपनीला कंत्राट देताना मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सीबीआयकडून करण्यात आला. एचटीएलचे अध्यक्ष देविंदर चौधरी यांचे ही या आरोपपत्रात नाव होते. त्यांच्या विरोधातही न्यायालयात खटला चालला. मात्र सुनावणी सुरू असतानाच चौधरी यांचे निधन झाले.

Sukhram
दोन वर्षे तुरुंगात राहावे लागलेल्या भुजबळांची चूक होती?

२००९ मध्ये न्यायालयाने सव्वा चार कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणी सुखराम यांना दोषी ठरविले होते. त्यानंतर सुखराम यांना २००२ मध्ये साहित्याचा पुरवठा करण्यासाठी कंत्राट देताना सरकारी तिजोरीचे एक कोटी ६६ लाख रुपयांचे नुकसान केल्याच्या अन्य एका प्रकरणातही भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या अंतर्गत तीन वर्षांची शिक्षा सुनावली. हैदराबादच्या अॅडव्हांस रेडिओ मास्टस कंपनीच्या रामा राव यांना बेकायदेशीररित्या फायदा मिळवून दिल्याचा आरोप सुखराम यांच्यावर ठेवण्यात आला.

Sukhram
'टेंडरनामा' IMPACT : सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई पालिकेला निर्देश

टोलिकॉम गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने सुखराम यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. त्यांना लगेचच ताब्यात घेऊन तिहार तुरुंगात पाठवण्यात आले. शिक्षेबरोबरच न्यायालयाने सुखराम यांना चार लाखांचा दंडही ठोठावला. १९९६ मधील या प्रकरणी न्यायालयाचा निकाल येण्यास २०११ उजडले. शिक्षा झाली त्याच वेळी सुखराम यांच्यावर दिल्लीतील रोहिणी न्यायालयाच्या परिसरातच एका व्यक्तीने हल्ला केला होता. हरिंदर सिंग असे या हल्लेखोराचे नाव होते.

Sukhram
गावसकरांनी 33 वर्षांनी सरकारला का दिली 21000स्क्वेअर फूट जमीन परत?

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात दूरसंचार मंत्री असलेल्या सुखराम यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अखेरीस तुरुंगात जावे लागले. त्यानंतर कॉंग्रेसने पक्षातून हाकालपट्टी केलेल्या सुखराम यांनी राज्याच्या राजकारणात भाजपशी सलगी साधत सत्तेचा मार्ग सोपा केला. मात्र, टेलिकॉम गैरव्यवहाराच्या या प्रकरणाने सुखराम यांची अखेरपर्यंत पाठ सोडली नाही.

Sukhram
अहमदनगर जिल्ह्याला वाळू लिलावातून मिळाला दीड कोटींचा महसूल

भाजपशी सलगी करून सत्तेत राहण्याच्या प्रयत्नांत त्यांना फार काळ यश आले नाही. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातील लोकांच्या मनावर राज्य करणारा हा नेता पुढे देशाच्या राजकारणातही मोठ्या पदांवर गेला. मात्र काही चुकीच्या निर्णयांमुळे सुखराम यांचा ज्या वेगाने उत्कर्ष झाला, त्याच वेगाने अस्तही झाला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com