गावसकरांनी 33 वर्षांनी सरकारला का दिली 21000स्क्वेअर फूट जमीन परत?

Sunil Gavaskar
Sunil GavaskarTendernama

मुंबई (Mumbai) : लिटील मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी अखेर ३३ वर्षांनंतर महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) वांद्रे येथील २१ हजार ३४८ स्क्वेअर फुटांचा भूखंड परत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने ही जमीन ओस पडल्याचे पाहिल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गावसकरांनी हा निर्णय घेतला.

Sunil Gavaskar
हिंद महामिनरल कोल वॉशरीतून एक लाख २० हजार टन कोळसा गेला कुठे?

सुनील गावस्कर यांना क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी 33 वर्षांपूर्वी (1988 मध्ये) सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला हा भूखंड देण्यात आला होता. त्यांनी त्यावेळी क्रिकेट अकादमी सुरु करण्याची विनंती केल्यानंतर ही जमीन देण्यात आली होती. मात्र, त्याठिकाणी गेल्या ३३ वर्षांत काहीही करण्यात आले नाही. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (Maharashtra Housing and Area Development Authority)ही जमीन जप्त करण्याची तयारी तयारी दर्शविली होती. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही नाराजी व्यक्त केली होती.

Sunil Gavaskar
'टेंडरनामा' IMPACT : सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई पालिकेला निर्देश

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने सुनील गावस्कर क्रिकेट फाऊंडेशन ट्रस्टला वांद्रे येथील रंगशारदा सभागृहाजवळ दिलेल्या या जमिनीबद्दल 1999, 2000 आणि 2007 या वर्षात अटी व शर्ती सुधारित केल्या गेल्या. अखेर गेल्या आठ महिन्यांपासून सरकार आणि गावसकरांमध्ये झालेल्या चर्चेनंतर गावसकरांनी ही जमीन परत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात क्रिकेट अकादमी स्थापन करू न शकल्याबद्दल खंतही व्यक्त केली होती.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com