लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; आता शिवाजीनगर स्थानकांवरून

Shivajinagar Station
Shivajinagar StationTendernama

पुणे (Pune) : शिवाजीनगर स्थानकांवर (Shivajinagar Railway Station) लोकलसाठी नवे फलाट बांधकाम पूर्ण झाले असून, फलाटावर ट्रॅक टाकण्याचे काम देखील अंतिम टप्यात आले आहे. पुणे स्थानकाच्या 'यार्ड रिमॉडेलिंग'च्या कामास सुरवात होण्याआधीच शिवाजीनगर स्थानकावरून लोकल टर्मिनलचा (Local Terminal) वापर सुरू होणार आहे.

Shivajinagar Station
पुण्यातून सुटणाऱ्या 16 रेल्वेगाड्यांचा प्रवास 'का' बनला धोकादायक?

पुणे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या जाणार आहे. यात पुणे ते लोणावळा दरम्यानची लोकल सेवा कमीत कमी प्रमाणात बाधित व्हावी, तसेच पुणे स्टेशनवरचा लोकल भार हलका करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर स्टेशनवर ईएमयू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट अर्थात लोकल) टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी ३३० मीटर लांबीचे नवीन फलाटसाठी १ कोटींचा खर्च झाला. १५ डब्यांची लोकल सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या लांबीचा फलाट बांधून तयार केला. हे टर्मिनल सुरू झाल्यावर लोणावळ्याला जाणाऱ्या सुमारे पंधरा लोकल शिवाजीनगर स्टेशनवरून सुटतील.

Shivajinagar Station
हुश्श! पुढचे 8 दिवस पुणेकरांची 'या' त्रासातून सुटका; मोठा निर्णय

पुणे स्टेशनवरचा भार कमी व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासन विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. हडपसर टर्मिनल, खडकी टर्मिनल यासह शिवाजीनगर स्टेशनवरचे ‘ईएमयू’ (लोकल) टर्मिनल देखील याचाच भाग आहे. नव्या फलाटामुळे लोकलसाठी स्वतंत्र लाईन तयार होईल. त्यामुळे एक प्रकारच्या स्टॅब्लिंग लाइनसारखा त्याचा वापर होईल. परिणामी, शिवाजीनगरवरचा फलाट एक व दोन हा मेल एक्स्प्रेससाठी मोकळा राहील. तसेच नव्या फलाटावरून लोणावळ्यासाठी लोकल सोडण्यात येईल.

Shivajinagar Station
एकविरा आई तू डोंगरावरी..! आता अवघ्या 3 मिनिटांत थेट पोहचा गडावर

शिवाजीनगर स्थानकावरील लोकल टर्मिनलचे काम जवळपास पूर्ण झाले. काही तांत्रिक कामांची परवानगी मिळाल्यावर याचा वापर सुरू होईल.

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com