एकविरा आई तू डोंगरावरी..! आता अवघ्या 3 मिनिटांत थेट पोहचा गडावर

Ekvira Devi Temple
Ekvira Devi TempleTendernama

पुणे (Pune) : मावळ तालुक्यातील कार्ले (Karle) येथील श्री एकविरा देवी (Ekvira Devi) दर्शनासाठी आता अवघ्या तीन मिनिटात गडावर पोचणे शक्य होणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) याठिकाणी रोपवे प्रकल्पाचे (Ropeway Project) काम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. या कंपनीकडून सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम (DPR) अंतिम टप्प्यात आले आहे.

Ekvira Devi Temple
पुण्यातून सुटणाऱ्या 16 रेल्वेगाड्यांचा प्रवास 'का' बनला धोकादायक?

एकविरा देवी मंदिर उंच ठिकाणी असल्याने सध्या पायऱ्या चढून गडावर जावे लागते. पर्यटकांच्या सोयीसाठी याठिकाणी रोपवे झाल्यास भाविक, पर्यटकांसाठी एक सुविधा निर्माण होणार आहे. तसेच अवघ्या तीन मिनिटात गडावर पोहचता येणार आहे. रोपवेद्वारे दर तासाला सुमारे १ हजार ४४० नागरिक गडावर पोचणार असून या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रोपवे प्रकल्प सुमारे १२० मीटर उंचीवर असून लांबी सुमारे २९० मीटर इतकी आहे. रोपवे प्रकल्प हा पूर्णतः: पर्यावरणपूरक असणार आहे. रोप-वे संदर्भातील प्रकल्प अहवाल राज्य शासनाकडे सादर केला आहे.

- राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी

Ekvira Devi Temple
हुश्श! पुढचे 8 दिवस पुणेकरांची 'या' त्रासातून सुटका; मोठा निर्णय

असे असेल स्वरूप...

- श्री एकविरा देवी हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक ओळखले जाते.

- टेकडीवर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी सध्या पायऱ्या आहेत.

- अनेक ज्येष्ठ नागरीकांना दर्शनासाठी जाताना अडचण निर्माण होते.

- राज्यातील अशा तीर्थस्थळांच्या विकास करण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. हे काम सरकारकडून एमएसआरडीसीला दिले आहे.

- पहिल्या टप्प्यात त्यामध्ये नऊ तीर्थस्थळांचा समावेश असून त्यापैकी श्री एकविरा देवीचा आहे.

- या ठिकाणी रोपवे उभारण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे.

- त्यासाठी टेंडर काढण्यात आल्या आहेत.

- एकविरा देवी मंदिराजवळच कार्ला लेणी हे पर्यटक आकर्षण आहे.

- एकविरा देवी मंदिरात दरवर्षी सात ते आठ लाख भाविक पर्यटक येतात.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com