लता मंगेशकर इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक अँड म्युझियमसाठी एवढा भूखंड

Lata Mangeshkar
Lata MangeshkarTendernama

मुंबई (Mumbai) : सुप्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने प्रस्तावित आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालयासाठी, राज्य सरकारने मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूझच्या कलिना कॅम्पसमध्ये 7,000 चौरस मीटरचा भूखंड दिला आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकताच जारी केला. ही जमीन उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कला संचालनालयाकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावित संस्था भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक अँड म्युझियम म्हणून ओळखली जाईल.

Lata Mangeshkar
शिंदे सरकारची १ लाख कोटींच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेची तयारी

ग्रंथालय संचालनालयाकडे कालिना कॅम्पसमध्ये मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्यासाठी 16,188 चौरस मीटरचा भूखंड असून, त्यापैकी 7 हजार चौरस मीटर इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक अँड म्युझियमसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासन निर्णयात 'ग्रंथालय संचालनालयाकडे कलिना कॅम्पसमध्ये भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक आणि भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर म्युझियम विकसित करण्यासाठी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला 7,000 चौरस मीटरचा खुला भूखंड सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.'

Lata Mangeshkar
238 नव्या एसी लोकल येण्याआधी होणार सर्वेक्षण; सल्लागारासाठी टेंडर

यासंदर्भात माहिती देताना विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी म्हणाले की, शासनाला हृदयनाथ मंगेशकर (लता मंगेशकर यांचे भाऊ) यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, ज्याद्वारे शासनाला आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाची संकल्पना समजेल. इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक हे मंगेशकर कुटुंबियांच्या संकल्पनेवर आधारित आहे, ज्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, झाकीर हुसेन, ए आर रहमान, सुरेश वाडकर यांचा समावेश आहे. राज्य सरकारने या शैक्षणिक वर्षात संगीत महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

Lata Mangeshkar
मुख्यमंत्र्यांच्या शहरातील रुग्णालयाचे ५२७ कोटींचे टेंडर कुणाला?

अलीकडेच यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिनिमित्त सुरु करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे 28 सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरत्या जागेची सुविधा उपलब्ध करून तातडीने यावर्षी किमान प्रमाणपत्र कोर्स सुरू करावा. त्यानंतर टप्याटप्याने पदविका आणि पदवी कोर्स सुरू करण्यात यावेत. हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आहे. तेवढेच दर्जेदार महाविद्यालय असले पाहिजे आणि तातडीने सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com