मुख्यमंत्र्यांच्या शहरातील रुग्णालयाचे ५२७ कोटींचे टेंडर कुणाला?

Hospital
HospitalTendernama

मुंबई (Mumbai) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कामाचे टेंडर गुरुवारी (ता.८) ओपन केले जाणार आहे. ९०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी ५२७ कोटीचा खर्च येणार आहे. त्यामुळे हे टेंडर कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Hospital
238 नव्या एसी लोकल येण्याआधी होणार सर्वेक्षण; सल्लागारासाठी टेंडर

सर्व अडथळे दूर झाल्यानंतर सुद्धा या रुग्णालयाची टेंडर प्रक्रिया मागील काही महिने प्रलंबित होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी हे टेंडर तातडीने काढण्याचे निर्देश दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही टेंडर प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे आता येत्या महिन्याभरात या रुग्णालयाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील रुग्णांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय खूप उपयुक्त ठरणार आहे.

Hospital
एकनाथ शिंदे सरकारचा पुन्हा यू-टर्न? आता हा निर्णय फिरविण्याची...

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाची उभारणी ब्रिटिश काळात म्हणजेच १९३६ मध्ये करण्यात आली होती. या जुन्या इमारती अतिशय जीर्ण आणि वापरण्यास अयोग्य झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या जुन्या इमारती पाडून त्याजागी सुपर स्पेश्यालिटी रुग्णालय उभारण्यास राज्य शासनाने ९ मार्च २०१८ मध्ये मान्यता दिली होती. ठाणे जिल्हा रुग्णालय ३६७ खाटांचे आहे. त्यात वाढ करून ५७४ खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा सुरुवातीला प्रस्ताव होता. त्यासाठी ३१४ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. काही कारणास्तव प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे निधी खर्च झाला नव्हता. त्याचदरम्यान नगरविकास विभागाने मंजूर केलेल्या नवीन एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार प्रस्तावित भूखंडावर ५.३० इतका चटई क्षेत्र निर्देशांक लागू झाला. त्यानुसार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रुग्णालयाचा सुधारित प्रस्ताव तयार केला. त्यास मंजुरी मिळावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. पूर्वीच्या प्रस्तावात सहा मजली इमारत प्रस्तावित होती. नव्या प्रस्तावानुसार दहा मजली इमारत होणार असून त्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती. यामुळे ५७४ खाटांऐवजी ९०० खाटांचे रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता. या कामासाठी राज्य शासनाने ५२७ कोटी ४१ लाखांचा निधी अडीच महिन्यांपूर्वी मंजूर केला आहे.

Hospital
शिंदे सरकारची १ लाख कोटींच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेची तयारी

या हॉस्पिटलमध्ये २०० सुपर स्पेशालिटी, २०० लहान मुले, डिलिव्हरी आणि महिला व ५०० खाटा जनरल रुग्णांसाठी ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जनरल खाटांमध्ये आर्थो, डोळे, रक्ताचे आजार, ज्येष्ठ नागरिक, डायलिसिस, आयसीयू, नाक, कान घसा आदी सर्वांचा समावेश असणार आहे. सर्व अडथळे दूर झाल्यानंतर या कामाची टेंडर प्रक्रिया मागील काही महिने प्रलंबित होती. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या कामाचे टेंडर तत्काळ काढण्याचे व पंधरा दिवसात प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने टेंडर प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर करुन ६ सप्टेंबरपर्यंत विविध ठेकेदार कंपन्यांकडून टेंडर मागविली होती आणि आज, ८ सप्टेंबरला टेंडर उघडण्याचे नियोजन केले आहे. टेंडर उघडल्यानंतर येत्या १५ दिवसांत सिव्हिल रुग्णालयाच्या इमारतीवर हातोडा पडणार आहे. जिल्हा रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या महिन्याभरात मनोरुग्णालय वास्तूच्या परिसरात स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामध्ये मुलांच्या वार्डसोबत डिलिव्हरी वॉर्ड, नेत्रविभाग, ब्लडबँक आदी कक्ष मनोरुग्णालयाजवळील शासकीय इमारतीत या महिना अखेर स्थलांतरित होत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिली. या सिव्हिल रुग्णालयात सर्जरी, फिजिओथेरपी, आर्थो, ईएनटी, आयसीयु आदी जनरल विभाग काही काळ कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर रुग्णालयाच्या जागेवर लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला प्रारंभ होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com