Yavatmal: यवतमाळवर 'या' विभागाकडून निधीचा पाऊस; 2 दिवसांत तब्बल 130 कोटींच्या...

Mantralaya
MantralayaTendernama

यवतमाळ (Yavatmal) : निवडणूक विभागाकडून प्रशासकीय तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे, प्रमुख राजकीय पक्षही लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला लागले असतानाच राज्याचा मृद व जलसंधारण विभागही निवडणुकीपूर्वी कामे मार्गी लागावीत म्हणून कधी नव्हे तो तत्पर झाला आहे. या विभागाने अवघ्या दोन दिवसांत तब्बल 28 आदेश काढून यवतमाळ जिल्ह्यात सुमारे 230 कोटींच्या निधींचा पाऊस पाडला आहे. कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर आता ही कामे उरकण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Mantralaya
Nashik ZP : सिन्नरच्या नवीन रिंगरोडसाठी दोन ग्रामीण मार्ग एमआडीसीला हस्तांतरित

पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे काही महिन्यांपूर्वीच राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाची धुरा आलेली आहे. या विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात लघु सिंचनाची कामे होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, बहुतांश कामे त्यांनी स्वतःच्या दिग्रस मतदारसंघातच ओढून नेली आहेत. अगदी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 7 डिसेंबर 2022 रोजी दोन आदेश जारी करीत तब्बल 9 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तर, त्यापूर्वी 22 डिसेंबर 2023 या एकाच दिवसात 26 शासन आदेश जारी करीत विविध कामांना मान्यता मिळविण्यात आली. 

अशी केली जाणार कामे : 

या दोन दिवसांतील मंजूर कामांची किंमतच 130 कोटी रुपयांहून अधिक होत आहे. 22 डिसेंबर रोजी नेर तालुक्यातील टाकळी, मांगलादेवी, कुरेगाव, धमक आणि कामनदेव येथे नाला रुंदीकरण व खोलीकरणासाठी 4 कोटी 97 लाख 45 हजार 910 रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याच दिवशी नेर तालुक्यातीलच मिलमिली नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी 4 कोटी 96 लाख 18 हजार 523 रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळविण्यात आली.

Mantralaya
Nashik : लोकसभा निवडणुकीपूर्वीच होणार निफाड ड्रायपोर्टचे भुमिपूजन

7 डिसेंबर रोजी तब्बल 26 आदेश जारी झाले. यामध्ये दारव्हा तालुक्यातील चोराडी, पाळोदी, उजव्या व डाव्या कालव्याच्या पाच कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. ही कामे चार कोटी 93 लाख 51 हजार 509 रुपये खर्चून होणार आहेत, याच दिवशी दारव्हा तालुक्यातीलच फतापूर, उदापूर येथे कोल्हापूर पद्धतीचे पाच बंधारे मंजूर करण्यात आले. ही कामे 4 कोटी 93 लाख 60 हजार 241 रुपये खर्चून करण्यात येत आहेत.

तर दारव्हा तालुक्यातील हातगाव, मुघल, सैंदनी येथील 4 कोटी 93 लाख 33 हजार 813 रुपये किमतीच्या पाच कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तर मानकोपरा आणि चिखली येथेही 4 कोटी 93 लाख 11 हजार 813 रुपये खचून पाच कामे करण्याचा निर्णय झाला. दिग्रस तालुक्यातील फुलवाडी आणि कळसा तर नेर तालुक्यातील घुई येथे पाच कामांना मंजुरी मिळाली. येथे 4 कोटी 93 लाख 66 हजार 813 रुपये खर्च होणार आहे.

दिग्रस तालुक्यातीलच तुपटाकळी, बेलोरा येथे चार कोटी 93 लाख 67 हजार 712 रुपये खर्चून कोल्हापुरी पद्धतीच्या पाच बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. दारव्हा तालुक्यातील फेकर्डा, टाकळी, शहापूर, शेंद्री खुर्द, मौजे डोल्हारी येथे चार कोटी 92 लाख 78 हजार 813 रुपये किमतीची पाच कामे तर दारव्हा तालुक्यातीलच लालापूर येथे चार कोटी 92 लाख 78 हजार 813 रुपये किमतीची पाच कामे होणार आहेत. तालुक्यातील टाकळी गंधपूर येथेही याच किमतीच्या पाच कामांना मंजूरी मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com