दीडशे वर्षांपूर्वीच्या ब्रिटीशकालीन पुलाचे करायचे तरी काय?

Old Bridge Kanhan River
Old Bridge Kanhan RiverTendernama

नागपूर (Nagpur) : ब्रिटिशांनी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग (Nagpur-Jabalpur National Highway) क्रमांक-७ वर कन्हान नदीवर बांधलेल्या पुलाचा समावेश वारसा यादीत (Heritage List) केला जाणार आहे. यंदा या पुलाने १४८ वर्षे पूर्ण केली आहेत. या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असली तरी त्याची कुठलीच काळजी घेतली जात नसल्याने तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (British Era Bridge)

Old Bridge Kanhan River
मुख्यमंत्र्यांच्या शहरातील रुग्णालयाचे ५२७ कोटींचे टेंडर कुणाला?

ब्रिटीशांनी १८७४ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी तयार केला होता. पुलाचा ढाचा ब्रिटिश इंजिनिअर एफ. एल. ओ. कोलाहगन व जी. डब्ल्यू मैक जार्ज यांनी तयार केला होता. ३३६ मीटर म्हणजेच १३२२ फूट लांब, ६.३२ मीटर रुंद पूल १३ पिलर व १२ कमानींच्या आधारावर तो उभा आहे. मध्य भारतातील सर्वांत आकर्षक आणि देखणा पूल असल्याची दखल ब्रिटिश राजपत्रामध्ये १८७० साली घेण्यात आली आहे. ब्रिटिश सरकारने भारत सरकारला एक पत्र पाठवून हा पूल मुदतबाह्य झाल्याचे कळविले होते. पत्राचाराच्या साधारणतः २०-२५ वर्षांचा काळ उलटल्यानंतर नागरिकांच्या संताप अनावर झालेला होता. तद्‍नंतर २०१४ मध्ये पर्यायी पुलाच्या बांधकामाला सुरुवात होऊन सप्टेंबर २०२२ मध्ये तो पूर्णत्वास आला. मात्र आता जुन्या पुलाचे काय, हा प्रश्न तसाच आहे.

Old Bridge Kanhan River
नाशिक ZP: कार्यकारी अभियंत्यांच्या कोण करतेय खोट्या सह्या?

कन्हान नदीवरील पुलाला राष्ट्रीय वास्तू घोषित करून त्याचे संवर्धन करण्याचे पत्रव्यवहार दीपचंद शेंडे यांच्याकडून सुरू होते. त्यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये पुरातत्त्व विभागाचे डॉ. शिल्पा जामगडे, अभियंता सर्वेक्षण सहायक हेमंत कुकरे, संशोधक विद्यार्थी डॉ. एकता धारकर हे नदीवरील पुलाच्या निरीक्षणासाठी कन्हान नदी येथे आले होते. पुलाच्या चहुबाजूने निरीक्षण करत त्यांनी पुलाची काही छायाचित्रे घेतली. पुलाच्या स्थितीचे वर्णन नोट केले होते.

Old Bridge Kanhan River
पेमेंटसाठीच ‘एमकेसीएल’ची थांबली हकालपट्टी? मंत्र्याच्या आदेशाचेही

पुलाच्या निरीक्षणाचा अहवाल विस्तारपूर्वक तयार करून छायाचित्रांसह दिल्ली पुरातत्त्व विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयानुसार केंद्रीय स्तरावरील विभागाच्या अधिकाऱ्यांची चमू पुलाला भेट देतील. त्यानंतर पुलाला राष्ट्रीय वास्तू म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचे पुरातत्व विभागातील चमूनी सांगितले होते. मात्र अद्याप तरी कुठल्याही हालचाली दिसून येत नाहीत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com