Wardha : 19 कोटींच्या पाइपलाइनचे भूमिपूजन होऊनही का रखडले काम?

Water
WaterTendernama

वर्धा (Wardha) : देवळी गावठाणाला पाणीपुरवठा करणाऱ्या 19 कोटी 6 लाख रुपये खर्चाच्या अंतर्गत पाइपलाइनच्या कामाचे भूमिपूजन होऊनही काम रखडले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मागील दोन महिन्यांपासून नागरिक 'वेट अॅण्ड वॉच' च्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.

Water
Nagpur : नागपुरातील 'या' मार्गावरील डांबरीकरणाचे काम कधी पूर्ण होणार?

कधी निधी प्राप्त न झाल्याचे कारण तर कधी जीवन प्राधिकरणकडून पाइपलाइनची टेस्टिंग होणे बाकी असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे. परिणामी पावसाळ्यात देवळीच्या गावठाणातील 94.46 किमी अंतरावर पाइपलाइनचे जाळे विणणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उन्हाळ्यातील कामे पावसाळ्यात करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लालफीतशाहीमुळे हा सर्व प्रकार होत असल्याचा आरोप होत आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानाअंतर्गत 19 कोटी 6 लाख खर्चातून शहरातील गावठाणासाठी अंतर्गत पाइपलाइनची योजना मंजूर केली. योजनेनुसार देवळीतील अतिशय जुनाट व तांत्रिकदृष्ट्या नादुरुस्त ठरलेल्या पाइपलाइनच्या ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार देवळीच्या पाच प्रभागातील 94.6 कि.मी. अंतरात ही पाइपलाइन टाकली जाणार आहे.

Water
Nagpur ZP : नागरी सुविधांच्या निधीचा वाद का पोहोचला विभागीय आयुक्तांच्या कोर्टात?

या योजनेत केंद्र शासनाचा 50 टक्के वाटा 9 कोटी 53 लाख, राज्य शासनाचा 45 टक्के वाटा आठ कोटी 58 लाख तसेच देवळी न.प.च्या 5 टक्क्याच्या वाट्यात 95  लाख रुपयांचा समावेश आहे. योजनेचा डीपीआर पुराणिक ब्रदर अँड कन्सलटिंग इंजिनिअर्स नागपूर यांनी केला आहे. तसेच कामाचा कंत्राट अकोला येथील गोपीचंद पंजवानी नामक व्यक्तीच्या कंपनीला सीएसआर दराने दिला आहे. यावेळी ऑनलाइन टेंडरमधील कंत्राटदाराची स्पर्धा नावाचीच ठरून सदर काम सीएसआर दराने देण्यात आले. त्यामुळे या बांधकामात वापरण्यात येणाऱ्या पाइपलाइनची गुणवत्ता तसेच तांत्रिक बाबी महत्त्वाच्या ठरणार आहे. या कामात इंदिरा नगर येथे 8.8 लाख लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकी बांधकामाचा समावेश करण्यात आला. शिवाय 180,160,140,125 तसेच 110 एमएम व्यासाची एचडीपीई पाइपलाइन अंथरून कामाच्या गुणवत्तेची अट टाकण्यात आली आहे. तसेच बांधकामादरम्यान खोदकामाची तांत्रिक गुणवत्ता तपासली जाणार आहे. यापूर्वी 60 वर्षांपूर्वी टाकलेली पाणीपुरवठ्याची पाइपलाइन जागोजागी फुटल्याने सदोष ठरली आहे. शिवाय ही पाइपलाइन पाच ते सहा फूट खोलवर गेल्याने दुरुस्त करणेसुद्धा कठीण झाले आहे. त्यातच गावठाणातील पाइपलाइन नादुरुस्त झाल्यानंतर न.प. कर्मचाऱ्यांना होत असलेला मनस्ताप तसेच पाण्याअभावी नागरिकांची उडालेली तारांबळ नेहमीचीच ठरली असल्याने नवीन पाइपलाइन योजना महत्त्वपूर्ण आहे.

अर्धवट कामांचा होतोय नागरिकांना मनस्ताप : 

सरकारच्या वतीने पाईपलाईन दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला होता या कामाचा श्रीगणेशाही करण्यात आला होता. परंतु काम अद्यापही अर्धवट असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कंत्रटदारांने केलेल्या दिरंगाईमुळे या कामाचा त्रास नागरिकांना होत आहे. अनेक ठिकाणी याकामाचे खोदकाम करण्यात आलेले असल्याने हे काम डोकेदुखी ठरत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com