Tender scam : टेंडर घोटाळ्याबद्दल विचारल्यानंतर PWD कार्यकारी अभियंत्याची अरेरावीची भाषा

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

भंडारा (Bhandara) : सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भंडारा येथील कार्यकारी अभियंता पराग ठमके यांना ई-टेंडरमध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भात व कंत्राटदारांना एनओसी देण्याच्या प्रक्रियेबाबत भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता, अरेरावी करण्यात आल्याचा प्रकार घडला. माहिती देण्याएवजी उर्मट भाषा वापरणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी संबंधिताने बांधकाम मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

Devendra Fadnavis
Nashik : ZPचे अंदाजपत्रक आहे की पोरखेळ? 59 कोटींचे अंदाजपत्रक सादर होऊन आठ दिवस उलटले तरी...

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत तुमसर तालुक्यातील कामांसदर्भात ई-टेंडर निघालेल्या आहेत. त्या भरण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना एनओसी या कार्यालयाकडून मागितली जाते. प्रत्यक्षात असा नियम नसतानाही हा प्रकार होत असल्याने कंत्राटदारांची नाराजी आहे.

कंत्राटदारांवर यामुळे आर्थिक भुर्दड बसत आहे. ई-टेंडरमध्ये घोळ असल्याच्या कंत्राटदारांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांची बाजू समजून घेण्यासाठी संबंधित पत्रकाराने त्यांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केली. यावेळी त्यांच्याकडून असभ्य भाषा वापरून, तुम्ही पत्रकार आहात तर वाटते ते लिहा. आम्ही उत्तर देऊ. फोनवरून सांगायची आवश्यकता काय आहे, असे उत्तर दिले होते, असे तक्रारीत म्हटले आहे.

Devendra Fadnavis
Nashik : इंडियाबुल्सला एमआयडीसीचा दणका; महिनाभरात 512 हेक्टर क्षेत्र खाली करा

कार्यालयात येऊन शहानिशा करा, एवढेच म्हणालो 

या प्रकारासंदर्भात कार्यकारी अभियंता पराग ठमके यांची बाजू घेतली असता ते म्हणाले, आपण उर्मटपणे बोललो नाही. कार्यालयात येऊन शहानिशा करून घ्या, असे म्हणालो होतो. माझ्या कार्यालयातील कार्यपद्धती मला माहीत असल्याने त्याबद्दल काही सांगू नका, असे आपण म्हणालो होतो, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com