Gadchiroli : उद्घाटन केल्यानंतरही स्मृती उद्यान अजूनही बंद

Gadchiroli
GadchiroliTendernama

गडचिरोली (Gadchiroli) : शहराच्या कॉम्प्लेक्स परिसरातील स्मृती उद्यान दुरुस्तीचे व सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले. आणि याला सहा महिने पूर्ण झाले असून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटनही 2 मे रोजी झाले. मात्र अजूनही हे स्मृती उद्यान कुलूपबंदच आहे. सदर उद्यान लोकांसाठी केव्हा खुले करणार, असा सवाल स्थानिक उपस्थित करत आहेत.

Gadchiroli
Mumbai : 'मेघा'ला बोरिवली-ठाणे दुहेरी बोगद्याच्या टेंडरची लॉटरी

वनविभागाने सदर उद्यान लवकर सुरू करावे. तेव्हाच कॉम्प्लेक्स परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना या उद्यानात सकाळ व सायंकाळला फिरता येईल. तसेच शहरातील नागरिकांकरिता पर्यटन म्हणून उद्यानामध्ये कुटुंबासह फिरता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. सदर स्मृती उद्यान मागील दोन वर्षांपासून बंद आहे. कोरोना संकटामुळे 2020 या वर्षात तर 2021-22 मध्ये दुरुस्ती व सुशोभीकरणाच्या कामासाठी हे उद्यान पर्यटकांसाठी बंद झाल्यावर दोनदा निवेदन देऊन उद्घाटन सोहळा करून सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

Gadchiroli
Nashik ZP : PWDची मनमानी; मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांचा तमाशा

अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळी सायंकाळला रस्त्याने फिरतात. उद्घाटन सोहळा होऊन एक आठवडा उलटला, परंतु उद्यान सुरू झाले नाही. अजूनही लोक उद्यान सुरु होण्याची प्रतीक्षा करीत आहे. या उद्यानाच्या नियंत्रण व देखभालीची जबाबदारी गडचिरोली वनविभागाची आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. कॉम्प्लेक्स परिसरातील स्मृती उद्यान लवकर सुरू करावे, अशी मागणी वनविभागाकडे आपण अनेकदा केली आहे. 60 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना या उद्यानात दररोज सकाळी आणि सायंकाळी मोफत प्रवेश देण्यात यावा, जेणेकरून त्यांना दिलासा मिळेल. दिवसभर इतर पर्यटकांना तिकीट दर आकारून प्रवेश द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, चे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com