Shambhuraj Desai : मंत्री शंभूराज देसाई 'तो' शब्द खरा करून दाखविणार का?

shambhuraje desai
shambhuraje desaiTendernama

नागपूर (Nagpur) : शेगाव पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग (Shegaon Pandharpur National Highway) 450 किमी लांबीचा असून, या मार्गावर जालना व बीड जिल्ह्यातील पुलांची प्रलंबित असलेली कामे एका महिन्यात सुरू करण्यास कंत्राटदारास सांगण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. अनेक दिवसांपासून बांधकाम रखडल्यामुळे लोकांना त्रास सहन करावे लागत आहे. काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. 

shambhuraje desai
Bacchu Kadu : दादा भुसे अन् झेडपीचा बच्चू कडूंनी रात्री पावणेबारालाच केला 'करेक्ट कार्यक्रम'!

सदस्य बबनराव लोणीकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. याबाबतच्या उत्तरात मंत्री देसाई म्हणाले की, या रस्त्याचे जवळपास 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. जोड रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने पुलांची कामे थांबली आहेत. भूसंपादनाबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात येईल. तथापि यासाठी पुलाचे काम थांबविणे योग्य नसून हे बंद असलेले काम एका महिन्यात सुरू करण्याबाबत संबंधित कंत्राटदारास सांगण्यात येईल. 

shambhuraje desai
Nashik : रखडलेल्या नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी नवीन ‘डीपीआर’चा उतारा

त्यानंतर काम सुरू न झाल्यास कारणे दाखवा नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच या प्रकरणी कोणी अधिकारी दोषी असल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. या कामाच्या अनुषंगाने संबंधित लोकप्रतिनिधींसमवेत एका महिन्यात बैठक आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com