Bacchu Kadu : दादा भुसे अन् झेडपीचा बच्चू कडूंनी रात्री पावणेबारालाच केला 'करेक्ट कार्यक्रम'!

Chandwad
ChandwadTendernama

नाशिक (Nashik) : सरकारी अधिकारी नियमांचे पालन करीत नसल्यास त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेऊन प्रसंगी कायदा हातात घेण्यासाठी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) ओळखले जातात. त्यांच्या रॉबीनहुड स्टाईलमुळे ते अल्पावधीत महाराष्ट्रभर पोहोचले. आमदार बच्चू कडू यांना सध्याच्या सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाचा दर्जा असूनही सरकारी यंत्रणेसोबत काम करण्याचा त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना विसर पडल्याचा प्रकार चांदवड तालुक्यात घडला.

Chandwad
Atul Save : मुंबईच्या डोंगरीतील उपकरप्राप्त इमारत दुरुस्तीची चौकशी; मंत्री सावे यांची घोषणा

नाशिक जिल्हा परिषदेने दिव्यांग कल्याण सेस निधीतून चांदवड येथे बांधलेल्या दिव्यांग भवनाचे परस्पर रात्री पावणेबाराला उद्घाटन करून टाकले. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी परस्पर छापलेल्या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आमदार कडू यांच्या सरकारी दौऱ्याच्या कार्यक्रमात समावेश नसतानाही त्यांनी केलेले उद्घाटन सध्या चर्चेचा विषय झाला आहे. राज्य सरकारमध्ये आपल्याला राज्यमंत्रीपदाचा दर्जा असल्याचा विसर कडू यांनी पडला की काय, अशी जिल्हाभरात चर्चा आहे.

नाशिक जिल्हा परिषदेने समाजकल्याण योजनेतून दिव्यांग कल्याणसाठीच्या जिल्हा परिषद सेसच्या पाच टक्के निधीतून चांदवड येथे दिव्यांग भवन उभारण्याचा २०१८ मध्ये निर्णय घेतला. या दिव्यांग भवनास जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समितीने दिव्यांग भवन उभारण्यासाठी मान्यता दिल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या दिव्यांग भवनासाठी इमारत बांधकामासाठी ४२ लाख रुपयांची प्रशासकी मान्यता दिली.

तसेच या दिव्यांग भवनाच्या माध्यमातून दिव्यांगासाठी सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना रोजगार प्रशिक्षण देणे आदी कामांसाठीही ४५ लाख रुपयांची आणखी एक प्रशासकीय मान्यता दिली.

Chandwad
Dada Bhuse : कराड-चिपळूण रेल्वेमार्गाबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक

जिल्हा परिषदेच्या सेसनिधीतून या दिव्यांग भवनाचे काम पूर्ण झाले. काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कामासाठी जिल्हा परिषदेचा सेस नसल्याने, तसेच प्रशासकीय कारकीर्द असल्याने त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. शासकीय कामकाज पद्धतीनुसार या दिव्यांग भवनाचे उद्घाटन पालकमंत्री, स्थानिक आमदार यांची वेळ निश्चित करून घेणे अपेक्षित असताना आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद यंत्रणेला अंधारात ठेवून परस्पर या उद्घाटन कार्यक्रमाच्या पत्रिका छापून घेतल्या.

त्या पत्रिकेनुसार पालकमंत्री दादा भुसे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन नियोजन केले. या कार्यकम पत्रिकेत शासकीय प्रोटोकॉलचा भंग करीत स्थानिक आमदार डॉ. राहुल आहेर यांना त्यांच्याच मतदारसंघातील कार्यक्रमात पाहुणे करण्यात आले.

Chandwad
तानाजी सावंतांना 'दणका'

या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिेषदेने केलेले नसल्याने या पत्रिकेतील कोणाही लोकप्रतिनिधींना शासकीय यंत्रणेकडून निमंत्रण पत्रिका पोहोचलीच नाही. दरम्यान चांदवड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रजेवर असल्याने त्यांचा प्रभार सांभाळत असलेल्या सहायक गटविकास अधिकारी यांच्यावर प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दबाव आणून कार्यक्रमास उपस्थित राहणे भाग पाडले.

आमदार बच्चू कडू यांच्या नाशिक जिल्ह्यातील शासकीय दौऱ्यात या दिव्यांग भवन उद्घाटन कार्यक्रमाचा समावेश नव्हता. त्यानंतरही कडू यांनी रात्री पावणेबाराला या दिव्यांग भवनाचे उद्घाटन केले.

Chandwad
ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा खुद्द मुख्यमंत्रीच घेणार आढावा; मंत्र्यांची माहिती

सहायक बीडीओला नोटीस
चांदवडचे दिव्यांग भवन जिल्हा परिषदेच्या सेसमधून उभारले असून त्याची जबाबदारी चांदवड पंचायत समितीकडे आहे. मात्र, चांदवडच्या सहायक गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांची परवानगी न घेता या दिव्यांग भवन इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम केला. यामुळे संबंधित सहायक गटविकास अधिकारी यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com