Atul Save : मुंबईच्या डोंगरीतील उपकरप्राप्त इमारत दुरुस्तीची चौकशी; मंत्री सावे यांची घोषणा

Nagpur Vidhanbhavan
Nagpur VidhanbhavanTendernama

नागपूर (Nagpur) : मुंबईतील डोंगरी भागातील उपकरप्राप्त इमारत ६-६अ च्या दुरुस्तीचे काम न करता म्हाडाने बिले अदा केली असल्यास त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी विधानसभेत केली.

Nagpur Vidhanbhavan
TENDERNAMA IMPACT : मंत्री सावंतांच्या खात्यात 'स्मार्ट' ठेकेदारासाठी फ्रेम केलेले 'ते' 3200 कोटींचे टेंडर अखेर रद्द

काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी या उपकरप्राप्त इमारतीची २०१८ मध्ये दुरुस्ती न करता म्हाडाने कामाची बिले अदा केल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सावे म्हणाले, या दोन इमारतींच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. म्हाडाकडे निधी उपलब्ध आहे. रहिवाश्यांनी वास्तुविशारद सूचवावा, त्याप्रमाणे दुरुस्तीचे काम केले जाईल. फातिमा मंझील इमारतीबाबतही वास्तुशास्त्रज्ञ सुचवून त्यानुसार काम केले जाईल. तसेच डोंगरी भागातील वार्डात मागच्या पाच वर्षात झालेल्या दुरुस्ती कामाचे अहवाल मागवले जाईल, असेही सावे यांनी सांगितले.

Nagpur Vidhanbhavan
Mumbai MHADA : मुंबईतील 50 हजार रहिवाशांना 'म्हाडा'ने दिली Good News!

यापूर्वीच म्हाडाला अर्थसंकल्पात ७९ कोटी रूपये, पावसाळी अधिवेशनात ९५ कोटी रूपये आणि हिवाळी अधिवेशनात ९८ कोटी रुपये निधी मिळाला आहे. विकास कामासाठी निधी कमी पडणार नाही. म्हाडातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. जाहिराती काढण्यात आल्या आहेत. लवकरच  रिक्त पदे भरले जातील, असेही अतुल सावे यांनी यावेळी  स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com