Wardha : दुर्लक्षित धोरणामुळे बुडतोय कोट्यवधींचा महसूल; 'या' पाच वाळू घाटांचा...

Sand
SandTendernama

वर्धा (Wardha) : आष्टी तालुक्यातील गेल्या तीन वर्षांपासून एकाही वाळू घाटाचा लिलाव केला नाही. घाटावर जमा झालेल्या वाळूचे वाळू चोरट्यांकडून राजरोसपणे उत्खनन करून उपसा सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाळूचोरट्यांचे चांगलेच फावते आहे. सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.

Sand
Mumbai : 700 एसी डबलडेकर ई-बसेसचा पुरवठा करण्यास 'कोसिस ई-मोबिलिटी प्रा. लि.' कंपनीचा नकार?

आष्टी तालुक्यातील अंतोरा, इस्माईलपूर, भिष्णूर, गोदावरी, भारसवाडा या वाळू घाटामधून दिवस- रात्र वाळूचे अवैध उत्खनन सुरू आहे. गावागावांत गाव पुढारी घाटावर वाहनामागे ठराविक रक्कम घेऊन दलाली करण्यासाठी सरसावले असल्याने अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यवसाय सुरु असल्याची र्चचा आहे. यातील काही वाळू घाटाला वनविभाग हद्दपार करून जावे लागते; मात्र वनविभागाच्या वतीनेही यावर कोणतीही कारवाई अद्याप केली नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. तालक्यातील अनेक गावातील लाभार्थीना घरकूल मंजूर झाले; मात्र घरकुलाच्या बांधकामासाठी पुरेशा प्रमाणात वाळ मिळत नाही. तालक्यात एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नाही असे असले तरी चढ्या दरात सर्रास वाळू मिळत आहे.

Sand
Nagpur : 'येथे' लवकरच सुरु होणार एमआयडीसीचे युनिट; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

रोजगाराच्या नावावर सुरू आहे व्यवसाय : 

तालुक्यात रोजगार नाही. त्यामुळे अनेक युवक रोजगाराच्या शोधात आहेत. वाळू चोरट्यांकडून जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्राचे उत्खनन करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली वाळू गाळायला लावतात. मजुरांना काम मिळत असल्याने गाव पुढारीही त्यांना साथ देत असल्याचे चित्र आहे.

त्या प्रकरणाची साधी तक्रारही नाही  :

अमरावती जिल्ह्यातील एका वाळू चोरट्याने दोन ट्रॅक्टर भरून साहूर मानि वाळू आणली. दरम्यान, एका वनरक्षकाने दोन्ही ट्रैक्टर पकडले होते. वनचौकीत ट्रॅक्टर लावण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या; मात्र वाळू चोरक्याने थेट ट्रैक्टरवरून उतरून वनरक्षकाची कॉलर पकडून मारहाण केली. त्यांच्या समोरच पकडलेला वाळूने भरलेला ट्रैक्टर घेऊन निघून गेला. हा प्रकार साहूरच्या काही नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला. मात्र या घटनेची साधी तक्रारही वनरक्षकाने दिली नसल्याने पाणी कुठे मुरतेय हा चर्चेचा विषय तरतो आहे.

Sand
Nagpur : एकीकडे वाहतूक कोंडीने वैताग अन् दुसरीकडे पूल सुरू करण्यासाठी नाही मुहूर्त

कुंपणच निघाले शेत खायला :

आष्टी पोलिस ठाण्यांतर्गत कार्यरत एका गृहरक्षकाच्या इशाऱ्याने हा व्यवसाय फोफावला असल्याची चर्चा आहे. तो स्वतः या वाळूचोरीच्या व्यवसायात गुंतला असून वाळूचोरीचे प्लॅनिंग आखले जाते. पाळू चोरट्यांना मार्गस्थ केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे कुंपणच शेत खायला निघाल्याने पोलिस प्रशासन तरी काय करणार अशी चर्चा सुरू आहे.

त्या प्रकरणाची साधी तक्रारही नाही :

अमरावती जिल्ह्यातील एका वाळू चोरट्याने दोन ट्रॅक्टर भरून साहूर मानि वाळू आणली. दरम्यान, एका वनरक्षकाने दोन्ही ट्रैक्टर पकडले होते. वनचौकीत ट्रॅक्टर लावण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या; मात्र वाळू चोरक्याने थेट ट्रैक्टरवरून उतरून वनरक्षकाची कॉलर पकडून मारहाण केली. त्यांच्या समोरच पकडलेला वाळूने भरलेला ट्रैक्टर घेऊन निघून गेला. हा प्रकार साहूरच्या काही नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला. मात्र या घटनेची साधी तक्रारही वनरक्षकाने दिली नसल्याने पाणी कुठे मुरतेय हा चर्चेचा विषय तरतो आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com