Nagpur : 'येथे' लवकरच सुरु होणार एमआयडीसीचे युनिट; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

नागपूर (Nagpur) : रामटेक व पारशिवनी येथे एमआयडीसी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचा नवीन युनिट लवकरच सुरू होणार आहे. इतर विकास योजनांचाही विचार करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करून दिली. सोबतच आश्वासन दिले की एमआयडीसीचे नवीन यूनिट लवकर सुरु करण्यात येणार. रविवारी एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेत उद्योग आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनी विविध विषयांवर माहिती दिली.

Eknath Shinde
Nagpur : नागपुरातील 'या' मार्गावरील डांबरीकरणाचे काम कधी पूर्ण होणार?

सर्व समस्या दूर होतील : 

बैठकीत जिल्ह्यातील औद्योगिक विकासाबाबत सूचना केल्या. औद्योगिक क्षेत्राचे सर्व प्रश्न सोडवले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. औद्योगिक क्षेत्रातील फायली निकाली काढण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागाच्या डेप्युटी सीईओंची नागपुरात नियुक्ती करण्यात येणार आहे. विविध समस्यांच्या सुनावणीसाठी मुंबईला जाण्याची गरज भासू नये. सिंगल विंडो क्लिअरन्स असावा. राज्य सरकार उद्योगस्नेही आहे. महिला उद्योजिका रश्मी कुलकर्णी यांनी महिलांसाठी स्वतंत्र उद्योग क्षेत्र असावे, अशी सूचना केली.

Eknath Shinde
Nagpur ZP : नागरी सुविधांच्या निधीचा वाद का पोहोचला विभागीय आयुक्तांच्या कोर्टात?

300 एकर जागेवर झोन तयार करण्याची मागणी : 

300 एकर जागेवर इलेक्ट्रॉनिक उद्योगासाठी झोन ​​तयार करण्याची मागणी करण्यात आली. एमआयडीसी बोर्डात एका उद्योजकाला सदस्य म्हणून घेतले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. महामंडळ स्थापन व्हावे, अशी व्यापाऱ्यांची इच्छा आहे. मिहानसाठी मुंबईतील अधिकारी नागपुरात पाठवले जातील. बैठकीत माजी मंत्री दीपक सावंत, शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे, आमदार आशिष जैस्वाल, खासदार कृपाल तुमाने, उद्योग व आरोग्य उपचार सेवा क्षेत्रातील प्रतिनिधी दीपेन अग्रवाल, प्रवीण तापडिया, पी. मोहन, डॉ. प्रमोद गिरी, डॉ. संजीव चौधरी, डॉ. व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com