Wardha : बजाज चौक येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण कधी होणार? नऊ वर्षांपासून काम सुरूच 

Bridge
BridgeTendernama

वर्धा (Wardha) : यवतमाळ, हिंगणघाट मार्गांना जोडणाऱ्या बजाज चौक येथील रेल्वे ओव्हर ब्रीज (आरओबी) वर वाहतुकीची कोंडी होत असल्याने या ठिकाणी नव्याने आरओबीच्या कामास सुरुवात झाली. मात्र, नऊ वर्षांत पुलाचे काम पूर्णत्वास गेले नाही. परिणामी अरुंद पुलामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. 

Bridge
Nagpur : महापालिकेचे क्रीडा संकुल; कंत्राटदार कमी कंत्राट घेऊन दुप्पट दर...

दिवसागणिक वाहनांची संख्या वाढत आहे. यात हिंगणघाट, यवतमाळ मार्गावर वाहतूक वाढल्याने बजाज चौक येथे असणाऱ्या रेल्वे ओव्हर ब्रीजवर वाहतुकीची कोंडी होऊ लागली. एखादे वाहन पुलावर बंद पडल्यास तासनतास या मार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर येथे नव्याने आरओबीचा प्रस्ताव मांडण्यात आला. आरओबीसह हिंगणघाट आणि यवतमाळ मार्गाच्या रुंदीकरणाचे कामही हाती घेतले. शहरात विकास घोडदौड करीत असल्याचे चित्र तेव्हा पाहायला मिळाले. आरओबीच्या कामात रस्ते अरूंद पडू नयेत म्हणून एपीएमसी चौक रुंदीकरणाचे त्यासोबतच यवतमाळ आणि हिंगणघाट मार्गाच्या दोन पदरी कामाला सुरुवात झाली. दरम्यान, पुलाचे तसेच दोन पदरी मार्गाचे काम पूर्ण झाले. मात्र, आरओबीचे काम अद्याप पूर्णत्त्वास गेले नाही, अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आढावा घेत काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. दोन महिन्यात, चार महिन्यात काम पूर्ण होईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, ही आश्वासने फेल ठरली. अद्याप पुलाचे काम पूर्णत्त्वास गेले नाही.

Bridge
Mumbai : 'त्या' 25 इमारती आणि 1200 घरांच्या क्लस्टर पुनर्विकासाला स्टे; राज्य सरकार तोंडघशी

काम पूर्ण झाले, फक्त प्रक्षेपणाची प्रतीक्षा :

आरओबीच्या कामाला गेल्या दोन वर्षात गती देण्यात आली. साधारण तीन महिन्यांपूर्वी 6 जानेवारीला पुलाचे गर्डर लॉचिंगचे काम हाती घेण्यात आले होते. त्यापूर्वी दोन वेळा लोखंडी गर्डरची ट्रायल घेण्यात आली होती. ती यशस्वी झाल्याने मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मध्यरात्री गर्डर लॉचिंग दरम्यान गर्डर सरकविणारे तीन रोलर तुटल्याने लॉचिंग फेल झाली होती. अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता काम थांबविण्यात आले होते.

नऊ वर्षांपासून काम प्रलंबित :

बजाज चौकाजवळील उड्डाणपुलाच्या कामात अनेक अडचणी आल्या. यामध्ये पुलाच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर, अतिक्रमण, इलेक्ट्रिक लाइनचे स्थलांतर, रेल्वे विभागाकडून वारंवार बदललेले डिआइन यामुळे 2015 मध्ये सीआरएफमधून मंजूर झालेला पूल नऊ वर्षापासून पूर्ण झालेला नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com