फडणवीस सरकारचे विदर्भाला मोठे गिफ्ट! 'समृद्धी'नंतर नव्या एक्सप्रेस-वेला ग्रीन सिग्नल

भंडारा-गडचिरोली ९४ किलोमीटरचा एक्सप्रेस-वे बांधणार; ९३१ कोटींच्या खर्चाला मान्यता
Mahayuti government
Mahayuti governmentTendernama
Published on

मुंबई (Mumbai): भंडारा ते गडचिरोली दरम्यान ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

Mahayuti government
Exclusive: जनतेच्या जीवाची किंमत काय? खासगी कंपनीला पायघड्या घालणारे ऊर्जा विभागातील 'ते' शुक्राचार्य कोण?

भंडारा ते गडचिरोली हा प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनास बैठकीत मान्यता देण्यात आली असून भूसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास यावेळी मान्यता देण्यात आली आहे.

Mahayuti government
BJP: ...तर मुंबईत एकही मोकळी जागा उरणार नाही!

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील इतरही महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे आहेत...

१- महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ जाहीर. सन २०५० पर्यंतचे नियोजन. सुमारे ३ हजार २६८ कोटी रुपयांचा आराखडा

२- अकोला येथील दि निळकंठ सहकारी सूतगिरणीला “खास बाब” म्हणून शासन अर्थसहाय मिळणार. अर्थसहाय्याच्या ५:४५:५० या गुणोत्तरानुसार निवड

३- मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच विद्यार्थींनीसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीने वाढ. हजारो विद्यार्थ्यी- विद्यार्थिनींना दिलासा

४- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ. राज्यभरात ११६ बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी, व अस्तित्वातील भवनांच्या दुरूस्तीसाठी असा एकूण १३२ कोटी ४८ लाखांचा खर्च. विविध ठिकाणी ७९ नवीन शेतकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव.

Mahayuti government
Eknath Shinde: घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी फुटणार?

५- आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेस २ वर्षे मुदतवाढ. नागपूर, काटोल, कळमेश्वर, (जि.नागपूर), मोर्शी (जि.अमरावती ) व संग्रामपूर, (जि.बुलढाणा) येथे आधुनिक संत्रा केंद्र उभारण्यात येत आहेत. मुदतवाढीसह योजनेच्या स्वरुपात अनुषंगिक बदल करण्यास मान्यता

६- नवीनकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी संयुक्त उद्यम कंपनी. महानिर्मिती व मे.सतलज जलविद्युत निगम लि. यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास मान्यता. राज्यभरात ५ हजार मेगावॅट क्षमतचे प्रकल्प विकसित करणार

७- राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा. राज्यातील पायाभूत प्रकल्पांबाबत उपसमिती यापुढे मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज करणार

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com