Nagpur News : स्मार्ट प्रीपेड मीटर टेंडर विरोधात कोण उतरणार रस्त्यावर?

Smart Prepaid Meter Tender
Smart Prepaid Meter TenderTendernama

Nagpur News नागपूर : राज्यात 'स्मार्ट प्रीपेड मीटर' लावण्याचे कंत्राट (Smart Prepaid Meter Tender) ज्या चार कंपन्यांना देण्यात आले आहे. यात अदानी समूह, एनसीसी, मॉन्टे कार्लो आणि जिनस यांचा समावेश आहे. यापैकी नागपूरचे टेंडर मॉन्टे कार्लो या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने समृद्धी महामार्गासह अनेक सरकारी प्रकल्पात नियमांचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही अशा कंपन्यांना सरकार पाठीशी घालत आहे, असा आरोप नागपुरात आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. आम आदमी पार्टीतर्फे (AAP) संपूर्ण महाराष्ट्रात सक्तीच्या स्मार्ट प्रीपेट मीटर विरोधात करणार जनआंदोलन केले जाईल असी माहिती देण्यात आली.

Smart Prepaid Meter Tender
PWDने भर पावसात अंधारात बनविला रस्ता अन् दुसऱ्याच दिवशी...

आम आदमी पार्टीतर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात जन आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

घराघरात स्मार्ट प्रीपेट मीटर लागला तर महावितरणाच्या उपभोक्त्यांना किंवा ग्राहकांना 12 हजार रुपये भरावे लागणार आहेत. ही रक्कम अपेक्षित रकमेपेक्षा दुप्पट आहे. केंद्र सरकारने 2021 मध्ये पारित केलेल्या कायद्याअंतर्गत मार्च 2025 पर्यंत संपूर्ण देशात स्मार्ट प्रीपेड मीटर लागणार आहेत. महाराष्ट्र सरकारने 2 कोटी 25 लाख 65 हजार मीटर बदलविण्याची तयारी केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारचे 39 हजार 602 कोटी रुपये खर्च होणार आहेत. अदानी ग्रुप, एनसीसी कंपनी, मॉन्टे कार्लो अशा कंपन्यांना स्मार्ट मीटर बसविण्याचे टेंडर दिले आहेत. विशेष म्हणजे या कंपन्या बांधकाम व्यवसायातील कंपन्या आहेत.

Smart Prepaid Meter Tender
Mumbai Coastal Road : थरार...मुंबई कोस्टल रोडचा!

स्मार्ट प्रीपेट मीटर लावल्यामुळे विद्युत चोरी थांबणार असा दावा सरकार करत आहे. या  विरोधात आप घरोघरी जाऊन जनआंदोलन करत जनजागृती करणार आहे. स्मार्ट मीटर लागल्याने ग्राहकांचे नुकसानच होणार आहे. त्यामुळे ग्राहक प्रीपेड मीटरची सुविधा घेण्यास तयार होणार नाहीत. राज्यात ज्या ठिकाणी हे स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात आले आहे. त्याभागात नागरिकांच्या बिलाच्या रक्कमेत मोठी वाढ झाल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे नागपूरकरांवर याचे अतिरिक्त भार पडणार याकडे आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध करून लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राज्य संघटन सचिव भूषण ढाकूलकर, राज्य सचिव सोनू फटिंग, राज्य सचिव डॉ. शाहिद अली जाफरी, शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे आणि शहर सचिव सचिन वाघाडे यांच्या सह आपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com