Nagpur : महापालिका 'असे' करणार स्मार्ट डस्टबिनद्वारे कचरा संकलन

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. तर्फे शहरात 200 ठिकाणी 400 स्मार्ट डस्टबिन बसविण्यात येणार आहेत. डस्टबिन नागपुरात आले असून, लवकरच नागपूर शहराच्या मुख्य ठिकाणी 400 स्मार्ट डस्टबिन लावले जाणार आहेत. नागपूरच्या रामनगर, अभ्यंकर नगर आणि काही महत्वाच्या परिसरात स्मार्ट डस्टबिन लावल्या गेले आहेत. अंदाजे सव्वा दोन कोटी महापालिका या स्मार्ट डस्टबिनवर खर्च करीत आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

Nagpur
Eknath Shinde : 'गोदावरी' शुद्धीकरणासाठी कृती आराखडा तयार

या कंपनीला मिळाले टेंडर

स्मार्ट डस्टबिन बनवण्याचे टेंडर मुंबईच्या बायोक्रक्स या कंपनिला मिळाले आहे. विशेष म्हणजे हे डस्टबिन जर्मनी येथून बनून येत आहे. या स्मार्ट डस्टबिनची टेक्नोलॉजी जर्मनीने विकसित केलेली आहे. जिओ कंपनी या डस्टबिनसाठी सिम कार्ड उपलब्ध करून देत आहे. डस्टबिन चोरी होऊ नये म्हणून डस्टबिनमध्ये सेंसर बसवण्यात येणार आहेत.

Nagpur
Nashik ZP: जलजीवनच्या कामांना वन, जलसंपदा विभागाने का घातला खोडा?

हे आहे वैशिष्ट्य

डस्टबीनमध्ये सेन्सर बसविण्यात येणार असून, त्यामुळे डस्टबीनची चोरी होणार नाही. 70 ते 80 टक्के डस्टबिन कचऱ्याने भरले की, महापालिकेच्या स्वच्छता विभागाला त्याची माहिती सेन्सरद्वारे तत्काळ मिळणार आहे. माहिती मिळताच कचरा गोळा करणारे कर्मचारी डस्टबिनमधील कचरा उचलण्यासाठी पोहोचतील. त्यामुळे डस्टबिनच्या आसपास कचरा साचणार नाही. स्वच्छतेच्या क्रमवारीत नागपूरचा दर्जा सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मनपाच्या बहुतांश डस्टबिन चोरीला गेल्या. शहर स्वच्छतेच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने शहरभर 1200 हून अधिक डस्टबिन बसवले होते. यापैकी 600 हून अधिक डस्टबीन चोरीला गेल्या आहेत किंवा झीज होण्याच्या नादात बळी पडले असून, बसवलेल्या डस्टबीनमधून कचरा उचलण्याच्या बाबतीतही आरोग्य विभाग हलगर्जीपणा दाखवत आहे.

Nagpur
Nagpur: नागपूर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांवर का वाढला कामाचा ताण?

डस्टबिनच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर साचलेल्या कचऱ्याचा स्वच्छतेच्या मानांकनावर परिणाम झाला आणि नागपूर मागे पडले. व्यवस्था सुधारण्यासाठी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने स्मार्ट डस्टबिन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. जर कचऱ्यात आग लागली तर लगेच महापालिकेच्या स्वच्छता विभागाला माहिती मिळणार. कारण स्मार्ट डस्टबिनमध्ये फायर सेंसर सुद्धा लावण्यात आले आहे. हे स्मार्ट डस्टबिन 70 टक्के बंद तर 30 टक्के खुले आहे. विशेष म्हणजे पाऊसामुळे डस्टबिन खराब होऊ नये किंवा इतर व्यक्तिकडून डस्टबिन खराब करू नये म्हणून डस्टबिन पूर्णपणे खुले बनवले गेले नाही. या स्मार्ट डस्टबिनची क्षमता 1100 लीटरची आहे. डस्टबिन कचऱ्याने भरले की लगेच सेंसर द्वारे याचा मॅसेज महापालिकेच्या स्वच्छता विभागाला येणार आणि हे सर्व संगणकाद्वारे ऑपरेट केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com