
नागपूर (Nagpur) : उपराजधानी नागपूर येथे येत्या 21, 22 मार्चला जी-20 बैठक होणार आहे. त्यासाठी नागपुर महापालिकेला नववधुसारखे सजवण्याचे काम सुरु आहे.
महापालिकेचे उद्यान 17 वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते, आता त्याच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. या कामासाठी 80 लाख निधी मंजूर करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे बंद असलेले कारंजेही आता उडताना दिसतील. हे दृश्य पाहण्यासाठी थोडा वेळ थांबावे लागेल. G-20 साठी महापालिकेच्या परिसराला पॉलिश करण्याचे काम जोमाने सुरू करण्यात आले आहे. 80 लाख निधीतून हिरवळ, फुले, कारंजे यांचा काम केला जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर महापालिकेच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारापर्यंत हिरवळ
महापालिका मुख्यालय चकाचक करण्यासाठी महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरून बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुतळ्याभोवती ठिकठिकाणी उद्यान, लँडस्केपिंग आणि सुरक्षा कुंपण करण्यात येत आहे. महापालिकेचे उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी सांगितले की जी-20 टीम नागपुरात दाखल होण्यापूर्वी संपूर्ण काम पूर्ण केले जाईल. महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतीसमोर 17 वर्षांपूर्वी छोटेसे उद्यान बांधण्यात आले होते. तिथे जी - 20 साठी इंग्रजी गवताची लागवड करून हिरवळ करण्यात येणार आहे. फुलांची रोपे लावण्यात येणार आहे.
पदधिकाऱ्यांना डिप्टी सीएमने हडसावले
एकीकडे जी-20 मुळे शहरात विविध ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम केले जात आहे तर दुसरीकडे महापालिका नागरिकांच्या समस्येकड़े दुर्लक्ष करीत आहे. ही बाबा लक्षात येता, भाजप शहर कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदधिकाऱ्यांना चांगले हडसावले. जनतेशी संवादाचा अभाव वाढत आहे. जनतेपासूनचे अंतर असेच वाढले तर भविष्यात अडचणी वाढू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. याचे उदाहरण शिक्षक निवडणुकीतही पाहायला मिळाले. सध्या शहरातील जनता अनेक समस्यांमधून जात आहे. महापालिकेत प्रशासक असल्याने जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. झोन कार्यालयात तक्रारींचा डोंगर आहे. परिस्थिती अशी झाली आहे की जनता न्याय मागायला जावे तरी कोणाकडे? अधिकाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचा परिणाम म्हणजे प्रत्येक स्तरावर मनमानी वाढली आहे. लोकांना कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात. अखेर ही परिस्थिती का येऊ लागली आहे, उलट अधिकाऱ्यांनी वक्तशीरपणाने कामे करावीत.