Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal CorporationTendernama

Nagpur : अतिक्रमण विभागात रिक्त पदांमुळे नावापुरती होत आहे कारवाई

नागपूर (Nagpur) : शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचा स्वतंत्र अतिक्रमण विभाग आहे. शहरातील अतिक्रमण काढण्यात विभाग मागे पडत आहे. विभागातील निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. कारवाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला जात आहे. कर्मचाऱ्यांअभावी अतिक्रमणविरोधी मोहिम नीट चालवता येत नसल्याचेही विभागाने मान्य केले.

Nagpur Municipal Corporation
राज्यातील 88 हौसिंग प्रोजेक्ट रद्दचा प्रस्ताव; सर्वाधिक पुण्यात

प्रत्येक टप्प्यावर अतिक्रमण

शहरात अतिक्रमण झपाट्याने वाढत आहे. शहराच्या प्रत्येक टप्प्यावर रस्ते, फुटपाथ, सरकारी जमिनींवर अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. महापालिकेने 3 पथके तयार केली आहेत. एका पथकात 7-8 जवान असतात. शहरातील विविध झोनमध्ये अतिक्रमण कारवाई केली जाते. मोठी कारवाई झाली की सर्व पथके जमवून कारवाई केली जाते. शहराचा विस्तार होत असताना त्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. याउलट मंजूर झालेल्या पदांपैकी निम्म्याहून अधिक पदे  रिक्त पडलेली आहेत.

Nagpur Municipal Corporation
Nagpur: लाखोंचा खर्च होऊनही गोवारी शहीद स्मारकाची दुरावस्था कायम?

शहरात इतक्या जास्त प्रमाणात अतिक्रमण आहे की, इच्छा असूनही अतिक्रमण विभाग अतिक्रमण हटवू शकत नाही. कारण विभागाकडे कर्मचारिच नाही. कर्मचार्याच्या अभावी फक्त नावापूर्ती कारवाईची औपचारिकता केली जाते. सकाळी हटवलेले अतिक्रमण दुपारी पुन्हा जैसे थे दिसून येते. विभागात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कारवाई च्या नंतर काय सुरु आहे हे ही वळून पाहण्याची वेळ नाही. अतिक्रमण विभागात एकूण 48 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 22 कार्यरत आहेत. 26 पदे रिक्त आहेत. अभियंता सहाय्यक आणि हवालदाराची 4-4 पदे मंजूर आहेत. सर्व पदे रिक्त आहेत. चालकाची दोन पदे मंजूर असून त्यापैकी एक रिक्त आहे. रजा यांच्या 5 पदांपैकी 4 पदे रिक्त आहेत. गँगमनची 29 पदे मंजूर असून त्यापैकी 17 पदे कार्यरत असून 12 पदे रिक्त आहेत. सुताराचे एक पद मंजूर आहे, तेही रिक्त आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com